X
X

Pulwama Terrror Attack : जैशच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून मिळाली RDX स्फोटके

सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी आरडीएक्स स्फोटके वापरण्यात आली. लष्कराकडे ज्या दर्जाचे आरडीएक्स असते. त्या दर्जाचे आरडीएक्स या स्फोटासाठी वापरण्यात आले.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी उच्च तीव्रतेची आरडीएक्स स्फोटके वापरण्यात आली. लष्कराकडे ज्या दर्जाचे आरडीएक्स असते. त्या दर्जाचे आरडीएक्स या स्फोटासाठी वापरण्यात आले. पाकिस्तानी सरंक्षण दलांकडून दहशतवाद्यांना ही स्फोटके मिळाली असा निष्कर्ष फॉरेन्सिक तज्ञांनी काढला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

जैशच्या आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडवण्यासाठी मारुती इको व्हॅनचा वापर केला असेही फॉरेन्सिक तज्ञांनी सांगितले. गुरुवारी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर आपल्या प्राथमिक अहवालात स्फोटासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स महिन्याभरापूर्वी भारतात आणले असावे. स्फोटाच्या स्थळापासून पाच ते सात किलोमीटरच्या आत आरडीएक्सची जोडणी करण्यात आली असा फॉरेन्सिक तज्ञांनी निष्कर्ष काढला आहे.

स्फोटानंतर पाऊस झाला. त्यामुळे महत्वाचे पुरावे नष्ट झाले. आता अंतिम अहवालाची प्रतिक्षा आहे. ५० ते ७० किलो आरडीएक्स वापरण्यात आले असावे. १०० ते ३०० किलो आरडीएक्स असते तर जास्त नुकसान झाले असते असे वरिष्ठ फॉरेन्सिक तज्ञांचे मत आहे. अंतिम अहवलाला थोडा वेळ लागले. पण बॉम्ब बनवण्याच्या तंत्रात माहिर असलेला तज्ञ बॉम्ब बनवण्यासाठी भारतात आला असावा असा तज्ञांचा अंदाज आहे. जैशच्या आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकाने भरलेली एसयूव्ही सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला धडकवली. यात ४० जवान शहीद झाले.

22
Just Now!
X