Premium

लास वेगास विद्यापीठात झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

युनायटेड स्टेट्समधील लास वेगास (UNLV) येथील नेवाडा विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये बुधवारी गोळीबाराची घटना घडली.

shooting at las vegas
गोळीबाराच्या घटनेनंतर विद्यापीठात दाखल झालेले पोलीस (फोटो सौजन्य-रॉयटर्स)

युनायटेड स्टेट्समधील लास वेगास (UNLV) येथील नेवाडा विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये बुधवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारात संशयित आरोपीचाही मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लास वेगास येथील स्थानिक रुग्णालयात तीन मृतांसह एका गंभीर जखमी झालेल्या तरुणाला दाखल करण्यात आलं आहे. गोळीबार करणारा व्यक्तीही मृतावस्थेत सापडला आहे. पोलिसांबरोबरच्या चकमकीत संशयिताचा मृत्यू झाला की त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही, अशी माहिती लास वेगास पोलिसांनी एका निवेदनाद्वारे दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 3 died and 1 critically injured in gun firing at las vegas university gunman dead rmm

First published on: 07-12-2023 at 08:20 IST
Next Story
“राहुल गांधींच्या कार्यालयाला AM, PM मधला फरक कळत नाही, PMO कसं चालवणार..”, काय म्हणाले होते प्रणव मुखर्जी?