भाजपा खासदाराच्या इशाऱ्यानंतर एका रात्रीत बसस्टॉपवरील घुमट गायब, कर्नाटकातील म्हैसूरमधील घटनाA controversial dome on a bus stop at Mysuru in Karnataka removed after BJP MP Pratam Simha warning | Loksatta

भाजपा खासदाराच्या इशाऱ्यानंतर एका रात्रीत बसस्टॉपवरील घुमट गायब, कर्नाटकच्या म्हैसूरमधील घटना

याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकाऱ्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे

भाजपा खासदाराच्या इशाऱ्यानंतर एका रात्रीत बसस्टॉपवरील घुमट गायब, कर्नाटकच्या म्हैसूरमधील घटना
(फोटो- खासदार प्रताप सिम्हा यांच्या ट्विटरवरुन)

कर्नाटकातील म्हैसूर येथील बसस्टॉपवर बसवलेले वादग्रस्त घुमट रविवारी एका रात्रीत काढून टाकण्यात आले आहेत. हे घुमट पाडण्याची धमकी भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांनी दिल्यानंतर आता ते नाहीसे झाले आहेत. या बसस्टॉपवर मध्यभागी एक मोठा आणि आजुबाजुला दोन लहान घुमट बसवण्यात आले होते. हे घुमट मशिदीसारखे दिसत असल्याचा दावा करत सिम्हा यांनी ते काढून टाकण्यासाठी अल्टिमेटम दिला होता.

याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकाऱ्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. “बसस्टॉपबाबत वाद नको. मी आत्तापर्यंत म्हैसुरमध्ये १२ बसस्टॉप बांधले आहेत. मात्र, या बसस्टॉपला जातीय रंग देण्यात आल्याने मी दुखावलो आहे. ज्येष्ठांच्या सल्लामसलतीनंतर मोठा घुमट कायम ठेवून आजुबाजुचे दोन घुमट काढून टाकले आहेत. लोकांनी याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. विकासाच्या दृष्टीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे”, असे स्पष्टीकरण घुमट हटवणाऱ्या रामदास यांनी दिलं आहे.

कुटुंब शिर्डीला गेल्याचा फायदा घेत पोहोचला तरुणीच्या घरी, आजीला बेशुद्ध केलं अन् नंतर…; कर्नाटकमधील धर्मांतराच्या घटनेने खळबळ

दरम्यान, बसस्टॉपवरील दोन्ही घुमट कोणत्याही परिस्थितीत पाडू देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे आमदार तन्वीर यांनी दिला होता. घुमट काढल्यानंतर प्रताप सिम्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजुबाजूला लहान आणि मध्यभागी मोठा घुमट असेल तर त्या वास्तुला मशीद मानली जाते. त्यामुळे हे लहान घुमट काढून टाकल्याबाबत मी जिल्हाधिकारी आणि रामदास यांचे आभार मानतो”, असं ट्वीट प्रताप सिम्हा यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 11:39 IST
Next Story
रामदेव बाबांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन महुआ मोईत्रांची खोचक टीका; म्हणाल्या, “आता मला कळलं तुम्ही त्यावेळी महिलेच्या…”