अॅमेझॉन चंद्रावर आपले यान पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी अॅमेझॉनचे मालक जेफ बेझॉस यांनी ही घोषणा केली. ‘ब्लू ओरिजिन स्पेस प्रोग्राम’ अंतर्गत त्यांनी मून लँडर लॉन्च केले. हे मून लॅन्डर चार रोव्हर्स, नव्या पद्धतीने डिझाईन केलेले रॉकेट आणि सूपअप रॉकेटला वाहून नेण्यास सक्षम असल्याची माहिती बेझॉस यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या तीन वर्षांपासून नासाच्या वैज्ञानिकांसह आपण या मून लँडरवर काम करत असल्याचे बेझॉस म्हणाले. परंतु हे मून लँडर अवकाशात कधी झेपावेल याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सत्तेवर येताच ‘मिशन मून’ लवकरात लवकर राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ट्रम्प प्रशासनाने 2024 पर्यंत चंद्रावर पाऊल ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले होेते. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अॅमेझॉनने ‘ब्लू ओरिजिन स्पेस प्रोग्राम’वर नासाबरोबर काम करण्यास सुरूवात केली होती.

सध्या चीन, जपान, अमेरिकेसहित अनेक देश चंद्रावरील रहस्य जाणून घेण्यासाठी या अभियानावर काम करत आहेत. 1966 साली सोव्हिएत महासंघाने चंद्रावर ‘लूना 9’ उतरवले होते. त्यानंतर अमेरिकेनेही आपली महत्त्वाकांक्षी अपोलो ही मोहीम राबवली होती. या अभियानाअंतर्गत नासाने सूक्ष्म संशोधन केले होते. तसेत या अभियानाचे अमेरिकेने थेट प्रक्षेपणही करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon founder jeff bezos launches moon lander