अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा अतिभव्य सोहळा २२ जानेवारी रोजी पार पडला. या शूभ मुहूर्तावर बाळ जन्माला यावं याकरता अनेक गरोदर मातांनी रुग्णालयात सिझेरियनची विनंती केली होती. त्यानुसार, अनेक महिलांची काल २२ जानेवारी रोजी प्रसूती झाली. फिरोजाबादमधील एका मुस्लीम महिलेनेही काल सोमवारी एका मुलाला जन्म दिला. या खास दिनी बाळाचा जन्म झाल्याने या मातेने आपल्या मुलाचं नावही हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणारं ठेवलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठेवलं राम रहिम नाव

फरोजाबादमधील जिल्हा महिला रुग्णालयाचे प्रभारी डॉक्टर नवीन जैन यांनी सांगितले की, फरजाना या महिलेने सोमवारी एका मुलाला जन्म दिला. नवजात बालक आणि आईची प्रकृती उत्तम आहे. मुलाची आजी हुस्ना बानू यांनी नवजात बालकाचे नाव राम रहीम ठेवले आहे.” हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यासाठी तिने मुलाचे नाव राम रहीम ठेवल्याचे बानू यांनी सांगितले.

राम, राघव, राघवेंद्र, रघू….

कानपूरच्या गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या कार्यवाहक प्रभारी सीमा द्विवेदी यांनी सांगितले की, सोमवारी येथे २५ बाळांची प्रसूती झाली. २५ अर्भकांपैकी १० मुली होत्या तर उर्वरित मुले होती. भारती मिश्रा या महिलेनेही सोमवारी एका बाळाला जन्म दिला. बाळाच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडेल असा विश्वास ठेवून तिनेही आपल्या बाळाचं नाव राम असे ठेवले आहे. तर इतर मातांनी राघव, राघवेंद्र, रघू आणि रामेंद्र यांसारख्या प्रभू रामाच्या समानार्थी शब्दांसह त्यांच्या अर्भकांची नावे ठेवली आहेत.

हेही वाचा >> श्रीरामाच्या दर्शनासाठी लोटला जनसागर, गर्दी नियंत्रणाबाहेर, पोलीस म्हणाले, “अयोध्येला येऊ नका, आता थेट…”

पीटीआयशी फोनवर बोलताना द्विवेदी म्हणाल्या की, “अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक समारंभाच्या निमित्ताने अनेक गरोदर मातांनी त्यांना २२ जानेवारी रोजी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली होती.” तसंच, संभल जिल्ह्यात, चंदौसी येथील एका खाजगी नर्सिंग होमच्या डिलिव्हरी रूममध्ये एक लघु राम मंदिर उभारण्यात आले. सोमवारी गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्वी भगवान रामाचे दर्शन देण्यात आले.

डॉ. वंदना सक्सेना यांनी सांगितले की, अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेक प्रसंगी त्यांनी प्रसूतीची खोली आणि त्यांच्या नर्सिंग होममधील नवजात बाळाची खोली भगव्या रंगात सजवली आणि नवजात बालकाच्या खोलीत देवही ठेवला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birth of a muslim woman on pran pratishtha day the message of hindu muslim unity given by the babys name sgk