चीनमध्ये लष्कराने बंड केले असून, राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. उज्बेकिस्तान येथे पार पडलेल्या एससीओ ( शांघाई कॉरपोरेशन ऑर्गनायझेशन ) बैठकीनंतर क्षी जिनपिंग गायब झाले आहेत. तेव्हापासून ते कोणत्याही सार्वजनिक स्थळी दिसले नाही आहेत. लवकरच क्षी जिनपिंग सत्तेच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरूवात करणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच त्यांना नजरकैदेत ठेवल्याच्या अफवांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमधून अमेरिकेत पळून गेलेले पत्रकार झाओ लांजियनने केलेल्या ट्विटनंतर खरतरं या अफवांना सुरुवात झाली. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात विमाने रद्द करण्यात आली आहे, असे लांजियनने ट्विटमध्ये म्हटलं. त्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात लष्कराच्या गाड्या मोठ्या प्रमाणात चीनमधील रस्त्यावरून जाताना दिसल्या होत्या. उज्बेकिस्तान दौऱ्यावरून आल्यापासून राष्ट्रपती जिनपिंग सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाही आहे. त्यामुळे या अफवांना अधिक बळकटी मिळाली. मात्र, दौरानंतर राष्ट्रपती जिनपिंग अलगीकरणात असल्याचं सांगण्यात येत आहे.

चीनमधून अमेरिकेत पळून गेलेले पत्रकार झाओ लांजियनने केलेल्या ट्विटनंतर खरतरं या अफवांना सुरुवात झाली. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात विमाने रद्द करण्यात आली आहे, असे लांजियनने ट्विटमध्ये म्हटलं. त्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात लष्कराच्या गाड्या मोठ्या प्रमाणात चीनमधील रस्त्यावरून जाताना दिसल्या होत्या. उज्बेकिस्तान दौऱ्यावरून आल्यापासून राष्ट्रपती जिनपिंग सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाही आहे. त्यामुळे या अफवांना अधिक बळकटी मिळाली. मात्र, दौऱ्यानंतर राष्ट्रपती जिनपिंग अलगीकरणात असल्याचं सांगण्यात येत आहे.

चीनी माध्यमांची चुप्पी

जगभरात क्षी जिनपिंग यांच्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावरती चीनी माध्यमांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. चीनी माध्यमांच्या वृत्तांमध्ये क्षी जिनपिंग यांच्याबाबत वार्तांकनही केलं जात नाही आहे.

करोना नियमांमुळे अलगीकरणात?

मिळालेल्या माहितीनुसार, क्षी जिंनपिंग नजरकैदेत असल्याची अफवा आहे. राष्ट्राध्यक्ष विदेश दौऱ्यावरून आल्यामुळे अलगीकरणात आहेत. कारण चीनमध्ये करोनाबाबतीत कडक नियम करण्यात आलेले आहे.

हेही वाचा – काझीरंगा पार्कमधील सद्गुरू वासुदेव यांची रात्रीची जंगल सफारी वादाच्या भोवऱ्यात, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटने खळबळ

माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी राष्ट्रपती जिनपिंग यांच्याबाबत एक ट्विट केलं होते. त्यात ते म्हणाले, “चीनचे राष्ट्रपती जिनपिंग बीजिंग मध्ये नजरकैदेत आहेत? चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने क्षी जिनपिंग यांना लष्कराच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे. त्यानंतर जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याची अफवा आहे,” असं स्वामी यांनी म्हटलं होते.

चीनमध्ये सत्तापालट झाल्याचा दावा

तर, न्यूज हायलँड व्हिजन वृत्तसंकेतस्थळाने चीनमध्ये सत्तापालट झाल्याचा दावा केला आहे. चीनमधील सीपीसी सेंट्रल कमिटीच्या सदस्यांचे संरक्षण करणाऱ्या सेंट्रल गार्ड ब्युरोचे (सीजीबी) नियंत्रण आता चीनचे माजी अध्यक्ष हू जिंताओ, एक्स प्रीमियर वेन जिओबो आणि माजी स्थायी समिती सदस्य सॉंग पिंग यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा – काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन वाद रंगलेला असताना गुलाम नबी आझाद यांची मोठी घोषणा, जाहीर केला नवा पक्ष, म्हणाले…

दोन माजी मंत्र्यांना फाशीची शिक्षा

अलीकडेच चीनमध्ये दोन माजी मंत्र्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या कठोर शिक्षेमागे दोन्ही मंत्री भ्रष्ट असल्याचे कारण मानलं जात आहे. क्षी जिनपिंग यांच्याविरोधात कट रचणाऱ्या गटाचा भाग असल्यामुळे या दोन मंत्र्यांना शिक्षा झाल्याचेही अनेक अहवालांमध्ये म्हटले गेले होते. मात्र, चीनकडून याला भ्रष्टाचाराचे प्रकरण म्हटले गेले.

ली क्विआओ नवे राष्ट्राध्यक्ष?

क्षी जिनपिंग यांनी दुसऱ्यांदा आपल्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. १६ ऑक्टोबरपासून त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात होईल. त्यात आता चीनमध्ये सत्तापालट झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे १६ ऑक्टोबरला क्षी जिनपिंग नाहीतर राष्ट्रध्यक्ष म्हणून ली क्विआओ यांच्या नावार शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China president xi jinping missing house arrest or quarantine rumos of military coup in china ssa
First published on: 26-09-2022 at 15:09 IST