जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तांत्रिक सल्लागार गटाने आज कोव्हक्सिन लसीवरील कागदपत्रांचे पुनरावलोकन करत आहे. डेटा पुनरावलोकन अद्याप सुरु असुन कोव्हक्सिनला पुढील २४ तासांत WHO ची मान्यता मिळू शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, ही भारतीय लस पुढील २४ तासांत आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली जाऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरिस यांनी पत्रकारांना सांगितले की, तांत्रिक सल्लागार गट भारतात उत्पादित कोविड-१९ लसीवरील डेटाचे पुनरावलोकन करत आहे. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास आणि तांत्रिक सल्लागार गटाचे समाधान झाल्यास, कोव्हक्सिनला पुढील २४ तासांत आपत्कालीन वापरासाठी मंजूर केले जाऊ शकते. 

भारत सरकारने आपल्या देशात कोव्हक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे, परंतु WHO कडून मान्यता नसल्यामुळे, ज्या नागरिकांना लस मिळाली आहे ते सध्या परदेशात जाऊ शकत नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covaxin can be approved by who in the next 24 hours srk