जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलं आहे. काल म्हणजेच ६ डिसेंबर रोजी रात्री जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेने बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली तसंच ही मशीद पुन्हा बनवण्याची मागणीही या आंदोलनादरम्यान करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भात आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, जेएनयूएसयूच्या वतीने ६ डिसेंबरच्या रात्री एक मोर्चा काढण्यात आला. ६ डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. या दरम्यान जेएनयू विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष साकेत मून यांनी तसंच आंदोलनात उपस्थित अन्य डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बाबरी मशीद पुन्हा उभारण्याची मागणी केली.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. या घटनेच्या विरोधात जेएनयू कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनेने एक मोर्चा काढला. बाबरी मशिदीला पुन्हा उभारण्यात यावं अशी मागणी या मोर्चात कऱण्यात आली. या आंदोलनादरम्यान, ‘नही सहेंगे हाशिमपुरा, नही करेंगे दादरी, फिर बनाओ बाबरी, फिर बनाओ बाबरी’, अशा घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा – बाबरी मशीद विध्वंसाला २९ वर्षे पूर्ण; मथुरेत पोलीस बंदोबस्त तैनात, तर सोशल मीडियावर #6DecemberBlackDay होतोय ट्रेंड

साकेत मून याने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, हाशिमपुरा आणि दादरी या त्याच जागा आहेत जिथे हिंदू मुस्लीम दंगली झाल्या होत्या. अशाच पद्धतीने बाबरीमध्येही दंगली झाल्या होत्या. तिथे अन्याय झाला होता. अशा परिस्थितीत या मशिदीला पुन्हा बनवून हा अन्याय संपवून टाकता येईल.

जेएनयूएसयूच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनासाठी रात्री साडेआठ वाजता गंगा ढाबा परिसरात डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे अनेक कार्यकर्ते जमा झाले. इथून सुरू झालेला हा मोर्चा चंद्रभागा होस्टेलपर्यंत गेला. या विद्यार्थ्यांनी या व्यतिरिक्त अन्य वादग्रस्त घोषणा दिल्याचाही आरोप केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi jnusu demands for rebuilding babri mosque in ayodhya vsk