नवी दिल्ली: शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी-पूर्व विधानसभेच्या मतदारसंघाची (१६६) पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह ६ राज्यांतील विधानसभेच्या ७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला. उमेदवारी अर्ज भरण्याची १४ ऑक्टोबर हा अखेरचा दिवस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघासह बिहारमधील दोन, तर हरियाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि ओदिशा राज्यांतील प्रत्येकी एक अशा ७ जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.  या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होईल. १४ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून १५ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाईल. १७ ऑक्टोबपर्यंत अर्ज मागे घेता येतील. ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission announce date for seven assembly bypolls in six states zws
First published on: 04-10-2022 at 03:31 IST