judges reluctant to grant bail for fear being targeted cji dy chandrachud ssa 97 | Loksatta

“…म्हणून न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं मोठं वक्तव्य

“न्यायाधीशांना गुन्ह्याची पार्श्वभूमी माहिती नसते, असं नाही. पण…”, असेही सरन्यायाधीस म्हणाले.

Dy Chandrachud
सरन्यायाधीश चंद्रचूड ( संग्रहित छायाचित्र )

देशातील अनेक जिल्हा सत्र न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत जामीन न मिळाल्यामुळे आरोपी तुरुंगात खितपत पडले आहेत. यावरती देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लक्ष्य केले जाण्याच्या भीतीने न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात, असं मोठे विधान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं आहे.

बार कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते. “जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे उच्च न्यायालयात अनेक जामिनाच्या याचिका येऊन पडल्या आहेत. न्यायाधीशांना गुन्ह्याची पार्श्वभूमी माहिती नसते, असं नाही. पण, लक्ष्य केले जाण्याच्या भीतीने न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करत आहेत,” असं वक्तव्य सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केलं आहे.

हेही वाचा : आम्ही आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी…; श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा

तसेच, वकीलांच्या बदलीवरून अनेक जणांनी सरन्यायाधीशांची भेट घेणार आहेत. यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी चिंता व्यक्त केली आहे. “काही वकील बदली संदर्भात सरन्यायाधीशांची भेट घेऊ इच्छितात. ही त्यांची वैयक्तिक भेट असू शकते. पण, सरकारचा पाठिंबा असलेल्या कॉलेजियमच्या बाहेर ही गोष्ट सातत्याने घडली तर, त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे,” असे किरेन रिजिजू यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-11-2022 at 14:44 IST
Next Story
VIDEO: गरोदर कुत्रीची दांडक्याने हत्या, नंतर शेतातून फरफटत नेलं; विद्यार्थ्यांची क्रूरता पाहून तुमचीही तळपायाची आग मस्तकात जाईल