हमीभाव, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सरकारचे शेतकरी धोरण यासाठी देशातील सुमारे १८० शेतकरी संघटना राजधानी दिल्लीत एकत्र आल्या असून रामलीला मैदान ते संसदेपर्यंत किसान मुक्ती संसदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि या मोर्चोचे संयोजक खासदार राजू शेट्टी यांनी दिली. किमान समान कार्यक्रमावर या संघटना एकत्र आल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. सरकारला सत्तेवर येऊन साडेतीन वर्षे झाले. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ असे म्हटले होते. भाव तर दिला नाही, पण नंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हणाले. त्याच्यावरही या सरकारने काहीच केले नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय त्यांनी घेतला नाही, असेही शेट्टी म्हणाले. आम्ही शेती केली ती आमची चूक आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
