Terrorist Masood Azhar Death News : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा दावा केला जातो आहे की भारताचा शत्रू असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अजहर हा पाकिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात मारला गेला आहे. यासंदर्भातले काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दाव्यांनुसार सोमवारी एका बॉम्बस्फोटात मौलाना मसूद अझहर मारला गेला आहे असा दावा केला जातो आहे. याविषयी कुठलाही अधिकृत दावा समोर आलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

पाकिस्तानच्या सोशल मीडियावर काही पोस्ट फिरत आहेत. ज्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे की जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर मारला गेला आहे. मसूद अझहर भावलपूर मशिदीतून परत येत होता. त्यावेळी पहाटे पाचच्या सुमारास अज्ञात लोकांनी स्फोट घडवला. या स्फोटात मौलाना मसूद अझहर मारला गेल्याचा दावा करण्यात येतो आहे.

भारतातल्या X या प्लॅटफॉर्मवरही काही व्हिडीओ व्हायरल

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मृत्यूच्या बातमीनंतर आता संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. आता एका बॉम्बस्फोटात मौलाना मसूद अझहर मारला गेल्याचा दावा करण्यात येतो आहे. पाकिस्तानच्या सोशल मीडियानंतर आपल्याकडे X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अनेकांनी यासंदर्भातला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मौलाना मसूद अझहरचा उजवा हात समजला जाणारा रहीमुल्ला तारीक वर पाकिस्तानमध्ये अज्ञात लोकांनी गोळीबार केला. त्यात त्याचा मृ्यू झाला. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानात अनेक दहशतवाद्यांचा अशाच प्रकारे अज्ञातांकडून खात्मा करण्यात आला आहे. मात्र पाकिस्तान आत्ताप्रयंत या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात यशस्वी झालेला नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maulana masood azhar deadtwitter flooded with blast video netizens react scj