अहमदाबाद : अहमदाबादच्या न्यायालयाने शनिवारी मानवाधिकार कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड आणि माजी पोलीस महासंचालक आर. बी. श्रीकुमार यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी खोटे पुरावे तयार केल्याच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
विशेष सरकारी वकील अमित पटेल यांनी सांगितले, की सेटलवाड आणि श्रीकुमार यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना महानगर दंडाधिकारी एस. पी. पटेल यांच्यासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी या दोघांच्या कोठडीची मागणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या शनिवारी गुन्हा नोंदवल्यानंतर सेटलवाड आणि श्रीकुमार यांना अटक करण्यात आली.
पटेल म्हणाले, की तपासाधिकाऱ्याने पोलीस कोठडी मागितली नाही. त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
First published on: 03-07-2022 at 04:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teesta setalvad sreekumar remanded in judicial custody zws