देशाचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या नेत्याची लोकप्रियता नेमकी काय असते याची प्रचिती सध्या येत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. गुरुवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनीच त्यांच्याविषयीच्या पोस्ट करण्यास सुरुवात केली. फोटोंपासून ते अगदी त्यांच्या कवितांपर्यंत बऱ्याच गोष्टींना सोशल मीडियावर उधाण आलं. एला नेत्याला जनसामान्यांचं प्रेम नेमकं कितपत मिळू शकतं, याच्या सर्व मर्यादाच जणू ओलांडल्या गेल्याचं सध्या दिसत आहे.
नेता, कवी आणि एक व्यक्ती म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहमीच सर्वांच्या मनावर राज्य केलं. अशा या राजकारणातील भीष्म म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अटलजींचा एक व्हिडिओ ‘एएनआय’च्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अटलजी एका छोट्या पुरस्कारार्थीला मोठ्या प्रेमाने उचलून घेताना दिसत आहेत.
ANI ARCHIVES #WATCH Former PM #AtalBihariVajpayee lifts a young bravery award winner at the 2003 National Bravery Award ceremony. pic.twitter.com/oVYV47D4ov
— ANI (@ANI) August 16, 2018
https://twitter.com/mdoj91/status/1030086527190228992
वाचा : अग्रलेख: गीत नहीं गाता हूँ..
हा व्हिडिओ २००३ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय वीरता पुरस्कार प्रदान सोहळ्यातील असून तत्काली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं लहान मुलांवर असणारं प्रेम त्यातून पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून, त्यावर कमेंट करत जणू एका सुवर्णयुगाचाच अंत झाला आहे, अशी प्रतिक्रियाही दिली.