पूर्व चिनी सागरी प्रदेशावर दावा सांगून चीनने प्रक्षोभक व धमकीवजा कृत्य केले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी चीनची ही कृती अस्वीकार्य असल्याचे सांगितले.
गेल्या काही वर्षांत चीनच्या कृती या छोटय़ा असल्या तरी र्सवकष विचार करता त्यांच्या परराष्ट्र धोरणात मूलभूत बदल झालेला जाणवतो. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार तोडगा काढणे किंवा शांततामय मार्गाने प्रश्न सोडवणे आता त्यांच्या कृतीत दिसत नाही, जे पूर्वी ते करीत होते असे मत रिपब्लिकन पक्षाचे नेते व परराष्ट्र कामकाजविषयक आशिया-पॅसिफिक उपसमितीचे अध्यक्ष स्टीव्ह श्ॉबट यांनी सांगितले. चीनविषयी काँग्रेस सभागृहातील सुनावणीत त्यांनी सांगितले, की चीनची ही कृती प्रक्षोभक असून त्यामुळे अनावश्यक ताण निर्माण झाला आहे. चीनने त्या भागातील सुरक्षा व स्थिरता धोक्यात आणली असून, अमेरिकेच्या पॅसिफिकमधील अस्तित्वास आव्हान दिले आहे.
भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक सदस्य अमी बेरा यांनी सांगितले, की चीनने सागरी प्रदेशात वर्चस्व गाजवण्यासाठी केलेली कृती फार प्रक्षोभक आहे व ती आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यांच्या या कृत्यांमुळे आशिया-पॅसिफिक भागातील शांतता धोक्यात आली आहे.
जर चीनला या प्रदेशातील ते करीत असलेल्या दाव्यांवर आव्हान मिळाले नाहीतर त्यांची पकड मजबूत होण्याची भीती आहे, असेही ते म्हणाले.
रिपब्लिकन नेते रँडी फोर्बस यांनी सांगितले, की चीन प्रादेशिक वादात मुस्कटदाबीचे तंत्र वापरत आहे आता चीनची नौदल जहाजे ही जपानच्या शेनकाकू बेटांपासून पूर्व व दक्षिण चीन सागर, स्कारबरो शोल, स्प्रॅटली बेटे व खरेतर संपूर्ण दक्षिण चिनी सागरावर वर्चस्व गाजवत आहेत.
चीनच्या अलीकडच्या जाहीरनाम्यानुसार जपानच्या ताब्यात असलेल्या पूर्व चिनी सागरातील प्रदेश हा सुरक्षा प्रदेश घोषित केला आहे. दक्षिण चिनी सागरातील मासेमारीवरही त्यांनी काही र्निबध लादले आहेत, त्यामुळे मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrong to say china dominated coastal region america