भारतीयांकडून झालेल्या जोरदार टीकेनंतर फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या फेसबुक खात्यावरील जम्मू-काश्मीरशिवाय भारताचा नकाशा दाखवणारी पोस्ट वगळून टाकली आहे.
फेसबुकतर्फे इंटरनेटडॉटऑर्ग या नव्या सेवेचे मलावी येथून नुकतेच उद्घाटन करण्यात आले. त्याद्वारे भारतात फेसबुकच्या काही सेवा विनामूल्य पुरवण्यात येतील. या कार्यक्रमासंबंधी माहिती देणारी पोस्ट झुकेरबर्ग यांनी आपल्या फेसबुक ख्यात्यावर टाकली होती. मात्र त्यात वापरलेल्या भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीरचा भाग दिसत नव्हता. त्यावरून भारतीयांमध्ये मोठा असंतोष पसरला आणि त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर झुकेरबर्ग यांनी आपली पोस्ट वगळून टाकली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असतानाच तेथील सीसीटीव्ही या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने आपल्या वृत्तात भारताचा नकाशा जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशशिवाय दाखवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zuckerberg deletes post with wrong india map