एचआयव्ही नावाची जागतिक महामारी सुरू झाल्यापासून तब्बल ४० वर्षांनी यावर उपाय सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगातील करोनाची पहिली लस आणणाऱ्या अमेरिकेतील फार्मास्युटिकल आणि बायोटेक कंपनी मॉडर्ना एचआयव्ही लसींसाठी मानवी चाचण्या घेणार आहे, असं त्यांनी जाहीर केलंय. या लशीदेखील करोना लसीप्रमाणेच mRNA तंत्रज्ञानावर आधारित असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॉडर्ना त्यांच्या एचआयव्ही लशींच्या दोन व्हर्जनच्या चाचण्या घेणार आहे. ही एचआयव्हीवरील mRNAची पहिली लस आहे, ज्याची मानवांवर चाचणी केली जाणार आहे. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) क्लिनिकल ट्रायल्स रजिस्ट्रीनुसार, १८ ते ५० वयोगटातील ५६ HIV-निगेटीव्ह लोकांना पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये सहभागी केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये चार गट असतील. यातील दोन गटांना लसीचा मिश्र डोस दिला जाईल, तर इतर दोन गटांना दोनपैकी एक लस दिली जाईल. या चाचणीत सहभागी होणाऱ्या लोकांना ते कोणत्या गटात आहेत, त्याची माहिती दिली जाईल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moderna mrna candidate brings new hope for an hiv vaccine hrc
First published on: 07-09-2021 at 12:25 IST