What is LTE and VoLTE : मोबाईल ही काळाची गरज आहे. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण मोबाइलचा वापर करतात. मोबाइलशिवाय माणूस ही कल्पना आपण करू शकत नाही. प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाइल दिसतो. मोबाईलने माणसाच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त केले आहे. तुम्ही सुद्धा सतत मोबाईल वापरत असाल पण तुम्हाला कधी मोबाइलच्या स्क्रीनवर LTE आणि VoLTE दिसले आहे का? जर हो तर याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? अचानक मोबाइल स्क्रीनवर LTE आणि VoLTE का दिसतं? आज आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

LTE म्हणजे काय?

LTE चा फूल फॉर्म आहे लॉन्ग टर्म इवॉलूशन (Long Term Evolution) LTE ला 4G नेटवर्क सुद्धा म्हटले जाते. हे मोबाइल नेटवर्कचे तंत्रज्ञान आहे जे 4G नेटवर्क देते. LTE नेटवर्कशी जोडलेले असताना तुम्ही मोठ्या प्रमाणात डेटा वापरू शकता. डाऊनलोड किंवा अपलोड करू शकता. मात्र या नेटवर्कची एक समस्या आहे. जेव्हा तुमच्या मोबाइल स्क्रीनवर LTE नेटवर्क आले असेल त्या दरम्यान जर तुमच्या नंबरवर कोणी कॉल केला तर इंटरनेट बंद पडते पण VoLTE नेटवर्कमुळे ही समस्या दूर झाली आहे. एअरटेलनी पहिल्यांदा २०१२मध्ये भारतात LTE नेटवर्क सेवा सुरू केली होती.

हेही वाचा : साप वारंवार जीभ का बाहेर काढतात? काय आहे या मागील नेमकं कारण, जाणून घ्या

VoLTE म्हणजे काय?

VoLTE चा फूल फॉर्म आहे व्हॉइस ओव्हर लॉन्ग टर्म इवॉलूशन (Voice over Long Term Evolution) हे एक असं तंत्रज्ञान आहे ज्यामुळे LTE नेटवर्कची समस्या दूर होते. म्हणजेच 4G LTE नेटवर्क सुरू असताना जर तुमच्या नंबरवर कोणी कॉल केला तर तुमचे इंटरनेट बंद पडत नाही. या तंत्रज्ञानामध्ये तुम्ही चांगल्या हाय स्पीड इंटरनेट सेवेचा आनंद घेऊ शकता. २०१६ मध्ये रिलायन्स जिओनी भारतात पहिल्यांदा VoLTE सेवा सुरू केली होती.

आता या नंतर तुमच्या मोबाइल स्क्रीनवर LTE आणि VoLTE दिसले तर तुम्हाला त्यामागील कारण आणि याचा अर्थ सहजपणे समजेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is lte and volte appear suddenly on your mobile screen ndj