देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी निर्दोष सुटलेला दोषी संथन याचा मृत्यू झाला आहे. बुधवारी चेन्नईतील राजीव गांधी सरकारी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. सकाळी ७.५० वाजता संथन याने अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचे यकृत निकामी झाले होते, तसेच त्याला क्रिप्टोजेनिक सिरोसिसचा त्रास होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जानेवारी रोजी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजीव गांधी सरकारी रुग्णालयाचे डीन ई थेरनिराजन यांनी सांगितले की, बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास संथनला हृदयविकाराचा झटका आला, परंतु सीपीआर प्रक्रियेनंतर त्याचा श्वास पूर्ववत झाला आणि त्याला ऑक्सिजन देण्यात आला आणि त्याला व्हेंटिलेटरवरदेखील ठेवण्यात आले होते. मात्र, संतानने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने आज सकाळी ७.५० वाजता त्याचा मृत्यू झाला. डीन म्हणाले, ‘संथनचे शवविच्छेदन केले जाणार असून, मृतदेह श्रीलंकेला पाठवण्यासाठी कायदेशीर व्यवस्था करण्यात येत आहे.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संथन उर्फ ​​सुतेंथीराजा याला गंभीर अवस्थेत राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ५५ वर्षीय संथन याला तिरुची येथील महात्मा गांधी मेमोरियल सरकारी रुग्णालयातून दाखल करण्यास सांगण्यात आले होते. राजीव गांधी हत्येप्रकरणी ज्यांना यापूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्या सहा दोषींपैकी तो एक होता. २०२२ मध्ये सुटकेचा आदेश दिल्यानंतर त्याला घरी पाठवण्यासाठी एक पत्रही लिहिले होते.

संथनचा मृत्यू कसा झाला?

चेन्नईतील राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात बुधवारी संथनचे निधन झाले. त्याला गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्याच्यावर यकृताच्या आजारासंबंधी उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बुधवारी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी सकाळी ७.५० वाजता अखेरचा श्वास घेतला.

तो भारतात कधी आला आणि त्याने किती काळ तुरुंगात काढला?

श्रीलंकेचा नागरिक संथन राजीव गांधी हत्येप्रकरणी आरोपी क्रमांक २ होता. हत्येमागील सूत्रधार मानल्या गेलेल्या शिवरासन याच्याशी सक्रिय संबंध असल्याबद्दल त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. सीबीआयने केलेल्या केस फाइल्सनुसार, संथन एप्रिल १९९१ मध्ये शिवरासनबरोबर तामिळनाडूला आला होता. आरोपपत्रात त्याचे वर्णन LTTE च्या गुप्तचर शाखेचा सदस्य म्हणून करण्यात आले होते, जो शिवरासनच्या जवळचा होता. फेब्रुवारी १९८८ मध्ये शिवरासनच्या सल्ल्यानुसारच संथनने मद्रास (आताचे चेन्नई) मध्ये त्याचा अभ्यास सुरू ठेवला आणि फेब्रुवारी १९९० मध्ये त्याने मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळवला, जिथे त्याच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च एलटीटीईने केला.

हेही वाचाः क्रॉस व्होटिंगमुळे राज्यसभेचे चित्रच बदलले, महाराष्ट्र अन् ‘या’ राज्यांतून भाजपाचे ‘इतके’ उमेदवार आले निवडून

२१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची हत्या झाली. १९९८ मध्ये टाडा न्यायालयाने ४१ पैकी २६ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, ज्यामध्ये स्फोटात किंवा तपासादरम्यान मृत्यू झालेल्या १२ जणांचाही समावेश होता. मे १९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुरुगन, संथन, पेरारिवलन आणि नलिनी यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली, तर पायस, रविचंद्रन आणि जयकुमार यांच्या फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आणि त्यातील १९ जणांना मुक्त केले. संथनने ३२ वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला, ज्यात एक दशक एकांतवासात घालवला. २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने चौघांच्या फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलेपर्यंत तो २२ वर्षे फाशीचा कैदी होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये जेव्हा संथनसह इतर सहा जणांची सुटका झाली, तेव्हा त्याला एकही पॅरोल न मिळाल्याने त्याने ३२ वर्षांत तुरुंगाच्या संकुलातून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ होती. परंतु तीन दोषी असलेले पेरारिवलन, नलिनी आणि रविचंद्रन यांना सोडण्यात आले, तर चार श्रीलंकन नागरिक असलेले संथन, जयकुमार, रॉबर्ट पायस आणि मुरुगन यांना त्रिची इथल्या परदेशींसाठी असलेल्या विशेष तुरुंगात पाठवण्यात आले.

हेही वाचाः भारत जीपीटीचे ‘हनुमान’ एआय लवकरचं होणार लाँच; तुम्हाला ‘या’ Made In India मॉडेलबद्दल माहीत आहे का?

राज्य सरकार आणि केंद्र सरकारने त्यांच्या मायदेशी परत येण्यासाठी कागदोपत्री पेचात अडकवले. चौघांनीही अनेक याचिका लिहिल्या की, त्यांना मानवतावादी कारणास्तव मूलभूत स्वातंत्र्य नाकारण्यात आले. अधिकाऱ्यांनी वैद्यकीय मदत नाकारल्याच्या तक्रारीही होत्या. त्रिची तुरुंगात आश्रय घेतलेल्या चौघांपैकी संथन हा एकमेव श्रीलंकेचा नागरिक होता, ज्याला स्वतःच्या देशात परत यायचे होते. प्रदीर्घ विलंबानंतर शुक्रवारी चेन्नईतील विदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने (एफआरआरओ) संथनला श्रीलंकेत पाठवण्याचा आदेश जारी केला. मुरुगन, पायस आणि जयकुमार हे श्रीलंकेतील युद्धादरम्यान तेथे स्थलांतरित झालेल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये सामील होण्यासाठी युरोपला जाऊ इच्छित होते. २०१२ पासून संथनने पत्रकारांना अनेकदा भेटण्यास नकार दिला होता, तर पेरारिवलन, ज्याने संथनबरोबर जवळपास तीन दशके तुरुंगात घालवले, त्यांनी त्याला “स्वतःच्या जगात राहणारा” माणूस म्हणून आठवण करून दिली. संथन तुरुंगात कोणाशीही बोलला नाही. तो पूर्णपणे धार्मिक होता, तो वेल्लोर तुरुंगातील मंदिरात नियमितपणे पूजा आणि विधी करत असे. “तो जवळजवळ संपूर्ण दिवस तुरुंगाच्या मंदिरात बसायचा,” असंही पेरारिवलनने आधीच्या मुलाखतीत सांगितले.

त्याचे कुटुंब आता कुठे आहे?

संथनचे कुटुंब उत्तर श्रीलंकेतील जाफना जिल्ह्यातील उडुपिड्डी येथे राहते. २०१३ मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांची ७८ वर्षांची आई माहेश्वरी तिचा लहान मुलगा सुधाकरनबरोबर राहते. संथनने घर सोडल्यानंतर हे कुटुंब १९९५ मध्ये विस्थापित झाले आणि २०१० मध्येच त्यांच्या दोन खोल्यांच्या छोट्या घरात परतले. द इंडियन एक्स्प्रेसशी आपल्या भावापेक्षा १६ वर्षांनी लहान सुधाकरन म्हणाला की, तो १९९१ नंतर संथनला दोनदा भेटला, एकदा २०१४ मध्ये आणि नंतर २०१७ मध्ये भेटला. सुधाकरनच्या म्हणण्यानुसार, संथनने १९९० मध्ये लंडनमध्ये शिकण्यासाठी घर सोडले. “जेव्हा त्याला अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे तीन दिवसांनंतर लंडनला जाण्यासाठी तिकीट होते, जे मी दिवंगत विशेष तपास पथकाचे प्रमुख के राघोथामन यांच्या पुस्तकात वाचले आहे,” असंही सुधाकरन यांनी सांगितले.

“आमचे आयुष्य नेहमीच संकटात होते. मग ते एलटीटीईचे असो वा श्रीलंकन लष्कराचे आम्ही युद्धाचे बळी ठरलो. अटकेनंतर तो काही काळ पत्रे लिहीत असे, पण नंतर आमचा संपर्क तुटला. एकदा त्याने सांगितले की, तुम्हाला त्रास होईल या भीतीने त्याने संवाद कमी केला. तो लंडनला रवाना झाला, त्या काळात अत्यंत गरिबी होती. दिवसातून एकदाही तीन वेळा जेवण मिळत नव्हते. मला आठवते की माझी आई आमच्यासाठी जेवण कसे करायची. युद्ध संपल्यानंतर आम्ही उत्पन्नाचे व्यवस्थापन केले, माझ्या आईने तुरुंगात असलेल्या आपल्या मुलासाठी अन्नसुद्धा सोडले होते,” असेही सुधाकरन म्हणाले.

१९९१ मध्ये संथनला अटक झाल्यानंतर सुधाकरनने त्याला २०१४ मध्ये भेट दिली होती. “१९९० मध्ये तो घरातून निघून गेला, तेव्हा मी सहा वर्षांचा होतो. वेल्लोर मध्यवर्ती कारागृहातील पाहुण्यांच्या खोलीत आम्ही त्याची वाट पाहत होतो. ज्या क्षणी तो खोलीत आला, मी रडलो. मला पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, ‘थांब्या?’ (तूच माझा भाऊ आहेस ना?). मी म्हणालो, ‘आमम’ (हो). तो म्हणाला की, तो मला भेटला नसता जर त्याला माहीत असते की तो मीच आहे. मला तुला तुरुंगात नाही तर फक्त घरीच भेटायचे आहे, असंही संथन म्हणाला. तिकडच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, माझा अन्नान (मोठा भाऊ) मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. थोडंसं बोलून तो घाईघाईने परतला. त्याने मला आठवण करून दिली की, पुढच्या वेळी मी त्याला आगाऊ कळवायला हवे, कारण त्याला आत मंदिरात पूजा करायची आहे आणि तो मला भेटण्यासाठी पूजा लवकर संपवेल,” सुधाकरन म्हणाला. संथनची आई महेश्वरी यांना जीवनात युद्ध, दुःख आणि आजीवन शापात अडकलेल्या तिच्या मुलाची चिंता सतावत होती.

“आम्हाला सोडून गेला तो दिवस मला आठवतो. तो होता Sithirai Parvam (तमीळ महिन्यात चिथिराई हा एप्रिलमधील एक शुभ दिवस असतो)चा दिवस. त्या दिवशी मी उपवास केला होता. त्याने पुट्टू (तुकडा भात आणि नारळापासून बनवलेला डिश) खाल्ले आणि घर सोडले. तो असहाय होता. युद्ध सुरू होते. तो म्हणाला की, तो लंडनला जाईल आणि त्याच्या बहिणीला आणि भावालाही घेऊन जाईल,” असे २०२२ मध्ये संथनच्या सुटकेनंतर त्याच्या बहिणीने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajiv gandhi assassination case convict dies two years after acquittal who was santhan vrd
First published on: 29-02-2024 at 12:27 IST