विश्लेषण : उत्तर तारा म्हणजे नेमकं काय? दोन दिग्गजांनी काय उल्लेख केला? |This Word Means North star Vice President Jagdeep Dhankhar and CJI D Y Chandrachud have recently used the Word | Loksatta

विश्लेषण : उत्तर तारा म्हणजे नेमकं काय? दोन दिग्गजांनी काय उल्लेख केला?

भारताची संसद हा उत्तर तारा आहे असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं होतं. याचा अर्थ काय? वाचा सविस्तर

This Word Means North star
वाचा उत्तर तारा म्हणजे काय?

भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांनी शुक्रवारी हे प्रतिपादन केले की भारताची संसद हा ध्रुव तारा (North Star) आहे. लोकांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने साकार कशी होतील याची चर्चा करण्यासाठी आणि त्यावर विचार विनिमय करण्याचं हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मागच्या महिन्यात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केशवानंद भारती सर्वोच्च न्यायालयाने १९७३ मध्ये दिलेल्या निकालाचं उदाहरण दिलं. यामध्ये त्यांनी संविधानाच्या मूलभूत सिद्धांतांबाबत आणि व्याख्यांची तुलना ध्रुव ताऱ्याशी केली होती. ध्रुव ताऱ्याचं हे उदाहरण फार महत्त्वाचं आहे. देशातल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या पदावर बसणाऱ्या उच्चपदस्थांनी आपल्या संसदेची आणि संविधानाची तुलना ध्रुव ताऱ्याशी केली आहे. ध्रुव तारा अर्थात North Star म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊ.

Poloris अर्थात त्याला उत्तर दिशेचा चमकता तारा किंवा ध्रुव तारा असंही म्हटलं जातं. ध्रुव तारा हा अत्यंत तेजस्वी तारा आहे. आपल्या सूर्यापेक्षा त्याचं तेज २५०० पटीने जास्त आहे. त्याच्या तेजामुळे तो अगदी प्राचीन काळापासून माणसासाठी दिशा दर्शक ठरला आहे. उर्स मायनर या नक्षत्राचा भाग असलेला हा तारा पृथ्वीपासून ३२३ प्रकाश वर्षे लांब आहे.

खरंतर हा ध्रुव तारा हा आकाशातला सर्वात तेजस्वी तारा नाही. मात्र तो खूप सोप्या पद्धतीने डोळ्यांना दिसू शकतो. पोलारिस उत्तर ध्रुवापासून 1° पेक्षा कमी अंतरावर असल्याने, पृथ्वीच्या परिभ्रमण अक्षाच्या जवळजवळ थेट रेषेत तो उत्तरेकडच्या आकाशात स्थिरावलेला दिसतो. तर इतर तारे त्याच्या भोवती फिरताना दिसतात.

एकदा तुम्हाला आकाशात ध्रुवतारा दिसला की तुम्ही त्याच्या सहाय्याने इतर तीन दिशाही शोधू शकता. उत्तर दिशा सापडल्यानंतर आपल्याला दक्षिण दिशा सापडते आणि त्याच प्रमाणे पूर्व आणि पश्चिम दिशाही दिसतात.उत्तर तारा, ज्याला पोलारिस म्हणून ओळखले जाते, ते हरवल्यावर उत्तर शोधण्यासाठी शिबिरार्थी सहसा “होकायंत्र” म्हणून वापरतात. … बहुतेक आवश्यक नक्षत्र आकाशाच्या उत्तरेकडील भागात आढळत असल्याने, ते कोठे आहे ते शोधणे आवश्यक आहे.

रोमन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी ८५ ते १६५ इ.स.पू. या काळात पोलारिस शोधला असावा. पुरातन काळाच्या उत्तरार्धात नेव्हिगेशनसाठी ताऱ्याचा वापर केला जात असल्याचे काही पुरावे असले तरी, ‘एज ऑफ एक्सप्लोरेशन’ दरम्यान तो मानवी इतिहासाचा मध्यवर्ती भाग बनला होता हे नाकारता येत नाही. कोलंबसाने १४९२ च्या त्याच्या पहिल्या ट्रान्स अटलांटिक प्रवासात ध्रुव ताऱ्याचं वर्णन केलं आहे. हा तारा युरोपियन खलाशी, वसाहतवादी यांच्यासाठी खूप मदत करणारा ठरला. देशातल्या दोन दिग्गजांनी या ताऱ्याचं उदाहरण दिलं आहे. आपल्या देशाची संसद ही ध्रुवताऱ्यासारखी आहे आणि संविधान हे दिशा देणाऱ्या ध्रुवताऱ्यासारखं आहे असं या दोन दिग्गजांनी म्हटलं आहे. आपल्या देशासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब म्हटली पाहिजे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 19:46 IST
Next Story
विश्लेषण: पाकिस्तानने Wikipedia वर बंदी का घातली?