विश्लेषण : सार्वजनिकरित्या बंदूक बाळगण्यास नागरीकांना परवानगी; हिंसक वृत्तीला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा पाठिंबा?

अमेरिकेतील बंदूक संस्कृतीचा इतिहास सुमारे २३० वर्षांचा आहे.

अमेरिकेत दिवसेंदिवस हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या महिन्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटनांनी अमेरिकेसह संपूर्ण जग हळहळले होते. वर्षांनुवर्ष चालत आलेल्या शस्त्रे बाळगण्याबाबतच्या कायद्यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केली होती. अमेरिकेत खुलेआम बंदुका बाळगण्यावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. तसेच अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली होती. मात्र, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिकरीत्या बंदूक बाळगण्यावर अमेरिकन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बंदूक बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहे. बंदूक बाळगणे हा अमेरिकेतील नागरीकांचा मूलभूत अधिकार असल्याचे न्यायलयाने म्हणले आहे.

बंदुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?
अमेरिका सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, अमेरिकन लोकांना स्वसंरक्षणासाठी सार्वजनिक ठिकाणी बंदुक बाळगण्याचा अधिकार आहे. कारण एक चतुर्थांश पेक्षा अधिक अमेरिकन लोक इतर राज्यांमध्ये राहतात. त्या राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बंदूक बाळगण्याचा परवाना असणे बंधनकारक आहे. २००८ आणि २०१० साली अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बंदूक बाळगण्याबाबत मोठे निर्णय दिले होते. अमेरिकेतील व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी घरात बंदूक बाळगण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता सार्वजनिकरित्या बंदूक बाळगण्यावर न्यायलयाने निर्णय दिला आहे.

या निर्णयानंतर, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि बोस्टन तसेच इतर ठिकाणांसह अमेरिकेतील मोठ्या शहरांच्या रस्त्यावर लोक कायदेशीररित्या हँडगन बाळगू शकतील. अमेरिका लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक ज्या राज्यांमध्ये राहतात जिथे ही प्रणाली लागू होईल. एका दशकाहून अधिक काळातील बंदूक संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचा हा पहिला निर्णय आहे. टेक्सास, न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियामध्ये नुकत्याच झालेल्या सामूहिक गोळीबारानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

अमेरिकेचे लोक आता सार्वजनिक ठिकाणी बंदूक बाळगू शकतात का?
न्यायालयाने न्यूयॉर्कच्या बंदूक कायद्याच्या इतर भागांना स्पर्श केला नाही. परवाना मिळविण्यासाठी इतर आवश्यकतांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केले, की नागरीक सार्वजनिकरित्या बंदूक बाळगण्याच्या परवान्यासाठी अर्ज करू शकतात. मात्र, पूर्ण चौकशी करुनच परवाना देण्यात येणार आहे.

अमेरिकेत सार्वजनिक रित्या बंदूक बाळगण्याचा निर्णय ताबडतोब लागू होणार नाही. परवाना नियमांमध्ये दुरुस्ती करण्याचा विचार सरकार करत आहे. तसेच शाळांजवळ किंवा सार्वजनिक वाहतूक सारख्या विशिष्ट ठिकाणी बंदूक बाळगण्यावर बंदी घालण्यात येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडन संतापले आहेत. विचार न करता हा निर्णय घेतला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयावर सर्वांनीच आक्षेप घेतला पाहिजे. बिडेन यांना बंदूक संस्कृती संपवायची होती. एकतर बंदूक संस्कृती संपली पाहिजे किंवा बंदूक खरेदीचे वय १८ वर्षावरून २१ वर्षे करावे, असे मत जो बायडन यांनी व्यक्त केले.

अमेरिकेतील बंदूक संस्कृतीचा इतिहास सुमारे २३० वर्षांचा आहे. १७९१ मध्ये राज्यघटनेच्या दुसऱ्या दुरुस्तीनुसार, अमेरिकन नागरिकांना शस्त्रे ठेवण्याचा आणि खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला. ही संस्कृती अमेरिकेत इंग्रजांचे राज्य असताना सुरु झाली. त्याकाळी कायमस्वरूपी सुरक्षा दल नव्हते, म्हणूनच लोकांना स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी शस्त्रे ठेवण्याचा अधिकार देण्यात आला होता, पण अमेरिकेचा हा कायदा आजही कायम आहे.

४८% अमेरिकन लोक मानतात की बंदूक हिंसा ही एक मोठी समस्या आहे.
प्यू (pew) रिसर्च सेंटरच्या एप्रिल २०२१ च्या सर्वेक्षणात, अमेरिकेतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी बंदुक हिंसा ही देशासाठी मोठी समस्या असल्याचे म्हणले होते. लोकांनी बंदुकीच्या हिंसाचाराची समस्या ही हिंसक गुन्हेगारी, कोरोना विषाणू संकट इतकी मोठी समस्या मानली.
अमेरिकेत बंदूक संस्कृतीवर का नियंत्रण ठेवता येत नाही

अमेरिकेत बंदूक संस्कृतीवर का नियंत्रण ठेवता येत नाही?

२३० वर्षांनंतरही अमेरिकेने आपली बंदूक संस्कृती संपवलेली नाही. याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिला- अनेक अमेरिकन राष्ट्रपतींपासून तिथल्या राज्यांच्या राज्यपालांपर्यंत ही संस्कृती जपण्याचा सल्ला देण्यात आला होता. थिओडोर रुझवेल्टपासून फ्रँकलिन डी. रुझवेल्ट, जिमी कार्टर, जॉर्ज बुश सीनियर, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत अनेक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी बंदूक संस्कृतीचा पुरस्कार केला होता. Gallup २०२० च्या अहवालानुसार, डेमोक्रॅटिक पक्षाचे ९१ टक्के सदस्य बंदूकीबाबत कठोर कायदा बनवण्याच्या बाजूने होते. तर रिपब्लिकन पक्षाचे फक्त २४ टक्के सदस्यांचाच याला पाठिंबा होता. जो बायडन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे आहेत.

दुसरे कारण म्हणजे बंदूकीचे उत्पादक देखील ही संस्कृती टिकून राहण्याचे प्रमुख कारण आहे. २०१९ च्या अहवालानुसार, अमेरिकेत ६३ हजार परवानाधारक बंदूक विक्रेते होते. ज्यांनी त्या वर्षी अमेरिकन नागरिकांना ८३ हजार कोटी रुपयांच्या बंदुकांची विक्री केली. नॅशनल रायफल असोसिएशन (एनआरआय) ही अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली बंदूक विक्रेती संघटना आहे, जी तेथील संसद सदस्यांवर प्रभाव पाडण्यासाठी खूप पैसा खर्च करते. ही शक्तिशाली संघटना बंदूक संस्कृती संपवण्याच्या सरकारच्या धोरणाला विरोध करत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Us supreme court allowed to carry guns in public dpj

Next Story
विश्लेषण : जेहान दारुवाला… फॉर्म्युला-१ रेसिंगमध्ये भारताची नवी आशा?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी