पात्रता फेरीतील सर्व लढतींमध्ये दिमाखदार विजय मिळवत ओटॅगो व्होल्ट्स संघ मुख्य फेरीत दाखल झाला आहे. ब्रेन्डन मॅक्क्युलमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ओटॅगोचा विजयी झंझावात रोखण्याचे आव्हान पर्थ स्क्रॉर्चर्ससमोर आहे. पर्थच्या फलंदाजीची भिस्त सायमन कॅटिच, अ‍ॅडम व्होग्स, मार्कस नॉर्थ यांच्यावर आहे. गोलंदाजीत ब्रॅड हॉगच्या साथीला मायकेल बीअर, अ‍ॅश्टॉन अगर आणि अ‍ॅश्टॉन टर्नर हे फिरकी त्रिकुट आहे. ब्रेन्डन आणि नॅथन मॅक्युल्लम यांच्याभोवती ओटागाचे डावपेच केंद्रित आहेत. ब्रेंडान मॅक्क्युलम जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याला रोखणे ही पर्थसमोरची चिंता आहे. हमिश रुदरफोर्ड आणि नील ब्रूमलाही सूर गवसला आहे. इयान बटलर, जेम्स मॅकमिलन हे वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत.
वेळ : दुपारी ४ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स-२

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clt20 experienced perth scorchers look to take down otago volts