‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी दुसऱ्यांदा होणार बाबा!

चेन्नईच्या विजेतेपदासोबत धोनीच्या चाहत्यांना मिळाली अजून एक चांगली बातमी

csk captain ms dhoni and sakshi all set to become parents in 2022
विजेतेपदानंतर कुटुंबासमवेत धोनी

‘कॅप्टन कूल’ म्हणून प्रसिद्ध असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा आयपीएलचा राजा ठरला. अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला हरवत जेतेपद पटकावले. या आनंदासोबतच धोनीच्या चाहत्यांना अजून एक चांगली बातमी मिळाली आहे. धोनी पुन्हा एकदा बाबा होणार असल्याचे समोर आले आहे.

क्रिकट्रॅकरच्या वृत्तानुसार, धोनीची पत्नी गर्भवती आहे. धोनीचा संघसहकारी सुरेश रैनाची पत्नी प्रियंकानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. साक्षी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे प्रियंकाने सांगितले. अंतिम सामन्यानंतर साक्षी आणि झिवाने धोनीला घट्ट मिठी मारली. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

चेन्नईने चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नईचा संघ आयपीएल विजेता ठरला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तीन गडी बाद १९२ धावांची मजबूत धावसंख्या उभारली आणि नंतर त्यांच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोलकाताला ९ बाद १६५ धावांपर्यंत रोखले. चेन्नईच्या या विजेतेपदानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या साक्षीने आनंदाने उड्या मारल्या. चेन्नई जिंकताच तिच्या आजूबाजूच्या खास लोकांना मिठी मारून साक्षीने विजयाचे अभिनंदन केले.

हेही वाचा – ये दिल मांगे राहुल..! द्रविडबाबत ‘तो’ खुलासा होताच नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर जल्लोष

डेहराडूनच्या साक्षीने ४ जुलै २०१० रोजी धोनीशी लग्न केले. त्यावेळी साक्षी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करत होती आणि कोलकाताच्या ताज बंगाल हॉटेलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. साक्षी आणि माजी भारतीय कर्णधार धोनी एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते आणि त्यांचे वडील रांची येथे एकाच फर्ममध्ये काम करत होते. साक्षी आणि धोनी सुमारे दहा वर्षांनी कोलकाता येथे भेटले आणि दोन वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी लग्न केले. साक्षी आणि धोनीला झिवा नावाची मुलगी आहे. धोनी फेब्रुवारी २०१५ मध्ये पहिल्यांदा बाबा झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Csk captain ms dhoni and sakshi all set to become parents in 2022 adn

Next Story
काय सांगता! IPL फायनलसाठी गांगुलीनं पाकिस्तानच्या रमीझ राजांना दिलं होतं निमंत्रण, पण…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी