मैदानात आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने सर्वाना भुरळ पाडणारा दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक असलेल्या जॉन्टी ऱ्होड्सला मुलगी झाली आहे. जॉन्टीची पत्नी मेलेनीने सांताक्रूझ येथील सूर्या मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला आहे, विशेष म्हणजे जॉन्टीने या मुलीचे नाव ‘इंडिया जेन’ असे ठेवले आहे.
‘‘ बेबी ऱ्होड्सकडून शुभेच्छा. इंडिया जेनी ऱ्होड्सचा दुपारी ३:२९ वाजता जन्म झाला असून तिचे वजन आता ३.७ कि.गॅ्र. आहे. बाळ आणिोई दोघेही सुखरुप आहेत,’’ असे ट्विट जॉन्टीने केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jonty rhodes blessed with baby girl born by natural water birth in india