PR Sreejesh Says Vinesh Phogat is real fighter : भारतीय हॉकी स्टार पीआर श्रीजेशने मंगळवारी विनेश फोगटच्या कामगिरीचे कौतुक केले. त्याने सांगितले की तिच्यासोबत जे काही होत होते, तरी ती तरी स्पेनविरुद्धच्या कांस्यपदकाच्या सामन्यापूर्वी माझ्याकडे आली होती आणि म्हणाली, ‘भाई, नशीब तू एक भिंत आहेस, छान खेळ.’ यानंतर तो विनेशचे एक ‘फायटर’ म्हणून वर्णन करताना म्हणाला, ती किमान एका पदकासाठी पात्र आहे, परंतु त्याच वेळी ही घटना प्रत्येकासाठी एक धडा शिकवणारी आहे. कारण खेळ चालविण्यासाठी नियम आवश्यक आहेत.

विनेश रौप्य पदकास पात्र –

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकल्यानंतर पीआर श्रीजेशने निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती घेतल्यानंतर श्रीजेश म्हणाला, ‘विनेश रौप्य पदकास पात्र आहे. कारण तिने अंतिम फेरी गाठून पदक निश्चित केले होते. ज्यामुळे तिला अंतिम सामन्यात रौप्य किंवा सुवर्णपदक नक्कीच मिळाले असते. मात्र, शेवटच्या क्षणी सांगितले की तू अंतिम फेरीत खेळण्यास अपात्र आहेस. ज्यामुळे तिच्यासह सर्व भारतीयांना मोठा धक्का बसला.’

ती खरी ‘फायटर’ आहे –

स्टार हॉकीपटू पुढे म्हणाला, ‘जर मी तिच्या जागी असतो तर मी काय केले असते हे मला माहीत नाही. ती ‘फायटर’ आहे. कांस्यपदकाच्या सामन्यापूर्वी तिची भेट झाली. ती म्हणाली, ‘भाई, नशीब तू भिंत आहेस’, छान खेळ. मला वाटतं ती हसत हसत आपलं दुःख लपवत होती. ती खरंच ‘फायटर’ आहे. गेल्या वर्षभरात तिने जे काही अनुभवले, प्रशिक्षणानंतर ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आणि नंतर जिंकून अंतिम फेरीत पोहोचली.’

हेही वाचा – Vinesh Phogat : विनेश फोगटची प्रतीक्षा पुन्हा वाढली… आता रौप्यपदकासाठीचा क्रीडा लवादाचा निर्णय ‘या’ दिवशी येणार

नियम आणि सूचनांचे पालन करणे गरजेचे –

पीआर श्रीजेश पुढे म्हणाला, ‘पण त्याचा एक पैलू असा आहे की, तुम्ही ऑलिम्पिकमध्ये आहात, तुम्ही पूर्ण तयारी केली पाहिजे. तुम्ही कोणाकडे बोट दाखवू शकत नाही. जेव्हा तुम्ही तयारी करता तेव्हा नियम आणि सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. कारण खेळ सुंदर बनवण्यासाठी आणि तो चालवण्यासाठी नियम आणि सूचनांचे पालन करणे खूप आवश्यक असते.’

हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्या नताशाशी घटस्फोट झाल्यानंतर ‘या’ गायिकेला करतोय डेट? जाणून घ्या कोण आहे ती?

अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेशचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. या निर्णयाविरुद्ध कुस्तीपटूने गेल्या बुधवारी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टमध्ये अपील केले आणि त्याचा निकाल १६ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल. यासोबतच श्रीजेशने ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अनुभवी फुलबॅक अमित रोहिदासला मिळालेल्या रेड कार्डबाबतच्या नियमांचाही हवाला दिला.