Bangladesh Cricket Board Statement on Shakib Al Hasan: बांगलादेशचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून तिथे उभय संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. बांगलादेशचा संघ पहिला सामना जिंकून मालिकेत ०-१ ने आघाडीवर आहे. बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनने पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. पण बांगलादेशात त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झालेला असताना शकिब पुढील सामना खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह होते, त्यावर बीसीबीने वक्तव्य केले आहे. पाकिस्तानसोबतची कसोटी मालिका सुरू होण्याआधी बांगलादेशमध्ये दंगल आणि अराजकतेचे वातावरण होते.

पाकिस्तानसोबतची कसोटी मालिका सुरू होण्याआधी बांगलादेशमध्ये दंगल आणि अराजकतेचे वातावरण होते. यादरम्यानच अहवालानुसार ५ ऑगस्ट रोजी बांगलादेश दंगलीत एका तरुणाची हत्या करण्यात आली होती, ज्यामध्ये क्रिकेटर शाकिब अल हसनचे नाव देखील समोर आले होते. मृत रफीफुल इस्लामच्या वकिलांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे शाकिब अल हसनला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून काढून टाकण्याची विनंती केली होती. त्यावर आता बीसीबीचा मोठा निर्णय समोर आला आहे.

हेही वाचा – Jay Shah Net Worth: गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव, विविध व्यवसायातून दमदार कमाई, ३५व्या वर्षी आयसीसीचे बॉस; किती आहे जय शाहांची संपत्ती?

हत्येचा आरोप असलेल्या Shakib Al Hasanबाबत मोठी अपडेट

बांगलादेशमधील या दंगलीत १४६ जणांसह क्रिकेटर शकिब अल हसनचेही नाव पुढे आले होते. त्यानंतर न्यायालयाच्या वकिलाच्या वतीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला नोटीस पाठवण्यात आली. नोटीसमध्ये शकिब अल हसनवर कारवाई करून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काढून टाकण्यात यावे, असे म्हटले होते. त्यानंतर बांगलादेश क्रिकेटने सांगितले की, संघ सध्या रावळपिंडीत पाकिस्ताविरूद्ध कसोटी सामना खेळत आहे, या सामन्यानंतर शकिबबाबत निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा – Jay Shah: ऑलिम्पिक २०२८, कसोटी क्रिकेट अन् बजेट… जय शाह यांच्या ICC अध्यक्षपदाचा कार्यकाळ जागतिक क्रिकेटसाठी का महत्त्वाचा असणार?

आता बांगलादेश क्रिकेटचा निर्णयही समोर आला आहे. त्यानुसार जोपर्यंत शकिब अल हसनवरील सर्व आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत हा अष्टपैलू खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणार आहे. बीसीबीचे अध्यक्ष फारुख अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शकिब आंतरराष्ट्रीय संघासाठी खेळत राहणार आहे. शकिबला देशात परत बोलवण्यासाठी बोर्डाला कायदेशीर नोटीस मिळाली होती. पण आम्ही त्यांना याबाबत माहिती दिली आहे.” फक्त एफआयआर नोंदवण्यात आला आहे, तपास पूर्ण होईपर्यंत आणि तो आरोप सिद्ध होईपर्यंत शकिब खेळत राहणार आहे.

शकिबच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे तो खेळत राहणार आहे. फारूकी अहमद पुढे म्हणाले, “बांगलादेशचा संघ पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेनंतर भारत दौऱ्यावर जाणार आहे आणि या मालिकेत शकिबने खेळावं असं आम्हाला वाटतं. क्रिकेट बोर्डाने करार केलेला तो खेळाडू आहे आणि गरज पडल्यास त्याला आम्ही कायदेशीर मदतही करू.”