चॉकलेट प्रेमींनो सावधान! हो येत्या सात वर्षात चॉकलेटच्या निर्मितीसाठी वापरला जाणारा महत्वपूर्ण कोकोचे उत्पादन संपुष्टात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. इतकेच नाही, तर कोकोचे उत्पादन संपुष्टात येण्याची तारीखही तज्ज्ञांनी सुचविली आहे. २ ऑक्टोबर २०२० रोजी कोकोचे उत्पादन संपुष्टात येणार आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्याची जगातील चॉकलेटची मागणी बघता त्याप्रमाणात कोकोचे उत्पादन केले जात नाही. यात मोठी तफावत निर्माण झाली आहे आणि २०२० सालापर्यंत कोको उपलब्ध होणे कठीण जाणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत चॉकलेटचे दर देखील गगनाला भिडण्याची शक्यता आहे. जगात कोकोचे अपेक्षीत प्रमाणात सध्या उत्पादन होत नसल्याचेही लक्षात आले आहे. कारण, एकदा कोकोची लागवड केली की तब्बल चार वर्षानंतर त्यातून चॉकलेट उत्पादनासाठी लागणाऱया कोकोच्या बीया मिळतात. याचा अर्थ शेतकऱयाला चार वर्षे वाट बघावी लागते म्हणजेच, चार वर्षांनंतर घेतलेल्या पीकाचा नफा.
त्यामुळे कोकोची लागवड करण्यावर दुर्लक्ष केले जात आहे असेही तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे कोकोच्या उत्पादनाबाबतीत येत्या काही वर्षात प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chocolate meltdown the world will run out of cocoa by