अनेकांना वेळोवेळी हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याचा त्रास होतो. हिरड्यांमधून रक्त येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. तसेच अनेकदा आपण दात घासताना जास्त दाब दिल्याने हिरड्यांमधून किंवा ब्रिस्टल्सने ब्रश केल्याने देखील रक्तस्त्राव होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्फिनिटी क्लिनिकच्या संस्थापक, एंडोडोन्टिस्ट आणि एस्थेटिक डेंटिस्ट डॉ. दामिनी अग्रवाल यांच्या मते, दातांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, परंतु बरेच लोकं त्यांच्या हिरड्यांची काळजी घेणे विसरतात. खरं तर हिरड्या हा तुमच्या तोंडाच्या स्वच्छतेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तोंडाच्या आरोग्याचे नाव ऐकताच लोकं अनेकदा दातांबद्दल बोलतात. परंतु दातांसोबतच हिरड्या देखील आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

डॉ. दामिनी यांच्या मते, तुम्ही जर ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येत असेल, तर तुम्हाला तुमच्या हिरड्यांना हलकी सूज येऊ शकते, खरं तर हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव होणे खूप सामान्य आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला असे वाटत असेल तर तुमच्या दंतवैद्याकडे जाण्याचा सर्वोत्तम सल्ला घ्या. त्याच बरोबर असे काही घरगुती उपाय आहेत, जे हिरड्यांमधून रक्त येणे आणि सुजलेल्या हिरड्या थांबवण्यास मदत करू शकतात.

लवंगाचे तेल

लवंग तेल हे घरगुती उपचारांपैकी एक मानले जाते, ते हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यास आणि रक्तस्त्राव थांबविण्यास मदत करते. थोडेसे लवंगाचे तेल घेऊन ते थेट हिरड्यांवर चोळा किंवा एक-दोन लवंगा चावा. तुम्हाला थोडी जळजळ जाणवू शकते, परंतु ते सूज कमी करण्यास मदत करेल.

कोरफड

कोरफडमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे हिरड्यांची जळजळ कमी करणे. थोडा कोरफडाचा लगदा घ्या आणि हिरड्यांवर मसाज करा, नंतर काही वेळाने धुवा. याशिवाय, नैसर्गिक कोरफड व्हेरा जेल असलेल्या द्रवपदार्थांचे सेवन केल्याने हिरड्यांचे सौम्य आजार टाळता येतात.

नियमित ब्रश आणि फ्लॉसिंग करा

तुमच्या हिरड्यांची काळजी घेण्यासाठी, दिवसातून दोनदा ब्रश करून एकदा फ्लॉसिंग करा. यामुळे तुम्हाला पांढरे दात मिळण्यास मदत होईलच पण हिरड्यांचे अनेक आजार आणि दातांच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होईल.

धूम्रपान सोडणे

तंबाखू सेवन करणे टाळा. कारण ते तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी घातक ठरेल. धूम्रपान केल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या शरीराला प्लेकशी लढणे कठीण होते, परिणामी तुम्हाला हिरड्यांचा आजार होऊ शकतो.

व्हिटॅमिन सी

आवळा आणि लिंबू हे व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्रोत आहेत. त्यात हिरड्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी दररोज अर्धा आवळा किंवा लिंबू यांचे आहारात सेवन करणे फायदेशीर ठरेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefit troubled by periodontal disease use these home remedies you will get relief scsm