वाडय़ावस्त्या व झोपडपट्टय़ांमध्ये जाऊ न सर्वाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या एका आशा स्वयंसेविकेला साध्या खोकल्यासाठी विलगीकरणाचा शिक्का मारल्यामुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या संशयावरून अमानवी वागणूक देत तिला व कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न उजेडात आला आहे. अखेर या स्वयंसेविकेला कुटुंबीयांसह प्रशासनाने एका तात्पुरत्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चार ठिकाणांहून हुसकविल्यानंतर ही महिला पोलिसांकडे गेली. पोलिसांनीही तिला मदत न करता पुन्हा शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने शासकीय रुग्णालयात जाऊ न डॉक्टरांना अडचण सांगितली. परंतु काहीही उपयोग झाला नाही. अखेर तिने आशा स्वयंसेविका संघटनेच्या नेत्यांशी  संपर्क साधून मदत मागितली.

झाले काय?

शहरातील न्यू बुधवार पेठेत पती व दोन चिमुकल्यांसह राहणाऱ्या या महिलेला घशाचा संसर्ग झाला. यावर तिने शासकीय रुग्णालयात जात उपचार घेतले. खबरदारी म्हणून तिला १४ दिवस ‘होम क्वोरंटीन’ चा सल्ला दिला. त्यानुसार तिच्या हातावर शिक्काही मारला.तिचा हा शिक्का शेजारच्या काही महिलांनी पाहिल्यावर  करोना झाल्याचा संशय घेत परिसरातील नागरिकांनी तिला दुसरीकडे  जाण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे वैतागून तिने कुटुंबासह माहेरी आसरा घेतला. परंतु तिथेही तिला विरोध झाला. यानंतर तिने तुळजापूर वेशीत   मावशीचे घर गाठले.तिथूनही तिला हुसकावले गेले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exit on woman after seeing stamp only abn