गोवंशाची हत्या केल्याप्रकरणी येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ते फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गोवंश हत्याबंदी कायदा मंजूर झाल्यानंतर राज्यात अशा प्रकारे दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे.
आझादनगर भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी धाड टाकली असता हत्या झालेल्या गोवंशाचे मांस आढळून आले. या वेळी १५० किलो मांस जप्त करण्यात आले. कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना बघून शेडचा मालक व अन्य दोघांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी हवालदार रविराज जगताप यांच्या तक्रारीनुसार रशीद ऊर्फ पांडय़ा, हमीद ऊर्फ लेंडी व असिफ तलाठी या तिघा संशयितांविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 27-03-2015 at 04:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In a first 3 people booked for allegedly slaughtering calf in maharashtra