नितीन बोंबाडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिवासी समाजात जागृती करण्यासाठी बोली भाषेतून प्रसार

डहाणू: करोना संसर्गमुळे आदिवासी समाजात भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठी पालघरमधील वारली चित्रकारांनी  वारली चित्रकलेतून आदिवासी बांधवांना लक्षणे दिसल्यास चाचणी करण्याचे तसेच लसीकरण करण्याचा संदेश दिला आहे. इयत्ता ११ वीत शिकणारी तन्वी वरठा आणि इयत्ता ११ वीत शिकणारी सुचिता कामडी या विद्यार्थिनींनी आदिवासी बोलीभाषेचा वापर करून आदिवासी समाजामध्ये  करोनाविषयी  जनजागृती होण्यास मदत होत आहे.

पालघर जिल्हयात डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हा भाग आदिवासीबहूल असून आदिवासी समाजात करोना आजाराविषयी भीती आणि गैरसमज आहे. ताप, खोकला, सर्दी सारख्या लक्षणे असताना अंगावर आजार काढण्याचे तसेच गावठी औषधोपचार करण्याचे प्रकार होत आहेत.

ग्रामीण भागात करोनाचा प्रासार दिसून येत आहे. त्याचबरोबर करोना आजारासाठी प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी आदिवासी समाजात भीतीचे वातावरण असून गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे पालघर जिल्हयातील आदिवासी भागात लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी तन्वी अणि सुचिता हिने बोली भाषेचा वापर करुन करोना लक्षणांची माहिती देऊन औषधोपचार  तपासणी करण्यासाठी आदिवासी समाजाला आवाहन केले आहे.

आदिवासी समाजात अजून ही करोना लशीबद्दल खूप भीती पसरलेली आहे, अजून ही जनजागृती नाही, लोक गर्दी करत आहेत, लग्न करत आहेत, मुखपट्टय़ा नाहीत आणि आता तर तिसरी लाट येणार आहे, आदिवासी समाजात जनजागृती होणे खूप गरजेचे झाले आहे. आपली सुरक्षा, आपल्या हातात आहे हा संदेश पोचवण्यासाठी मदत होत आहे.

मी मुलींना ऑनलाइन वारली पैंटिंग शिकवत आहे. त्याचा बरोबर मला वाटले ही जनजागृती केली पाहिजे म्हणून वारली पेंटर शिकवणारी सुचिता कामडी आणि माझी मुलगी तन्वी वरठा यांना याबाबतची कल्पना सांगितल्यानंतर त्या दोघींनी वारली भाषा वापरून समर्पक चित्र बनवली. लोकांनी जागृत झाले पाहिजे, गावागावात हा संदेश पोहचला पाहिजे हा या मागचा हेतू आहे. आदिवासी समाजात जागृती करण्यासाठी अनेक उपक्रम करत आहोत.

कीर्ती वरठा, आदिवासी एकता परिषद

वारली भाषेतून संदेश

छातीत दुख, उसास घियास तरास, गल्यात खाज, डोकेदुखी अंगदुखी, थकवा कडकी, सर्दी, सुका खोकला ही करोना अजाराची लक्षणे असल्यास त्वरित ओषध घिजास. करोना आजाराला ठेवायचा हवा दूर ‘लस’ घ्या, मास्क वापरा, साबणाने हात धुवा, घरी राहा, सुरक्षित राहा, गर्दी करू नका, डोला ना, नाकाला हात लावू नका, सुरक्षित अंतर ठेवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spread through dialect to create awareness in the tribal community ssh