मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ९ मे रोजी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे कामकाज करण्यात येणार असल्या कारणाने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे हे काम करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंबंधी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं असून सांगण्यात आलं आहे की, महामार्ग पोलीस विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई-पणे द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना आणि प्रवाशांना कळवण्यात येत आहे की, ९ मे रोजी दुपारी १२ ते दोन वाजेपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे करण्यात येणार आहे.

सदर कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व माल वाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किमी ८५/५०० या ठिकाणी थांबण्यात येणार आहेत. हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-4) ने मुंबईकडे वळवण्यात येणार आहे. पोलिसांनी ब्लॉकदरम्यान पुणेकडून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालक आणि प्रवाशांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two hours block on mumbai pune highway transporation towards mumbai will be stopped