रक्षाबंधनच्या मुहूर्तावर अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा पोस्टर अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘रक्षाबंधन’ हेच चित्रपटाचं नाव असून त्यावरून हा चित्रपट बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असल्याचं स्पष्ट होतंय. या पोस्टरमध्ये अक्षयसोबत त्याच्या चार बहिणी पाहायला मिळत आहेत. त्याच्या हातावर राख्यासुद्धा बांधलेल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बस बहनें देती है १००% रिटर्न’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे. ‘तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे. माझ्या करिअरमध्ये मी आतापर्यंत सर्वांत कमी वेळात साइन केलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट मी माझी बहीण अल्का हिला आणि जगातलं सर्वांत खास बहीण-भावाच्या नात्याला समर्पित करतो’, असं कॅप्शन अक्षयने या पोस्टरला दिलं आहे.

या चित्रपटाची पटकथा हिमांशू शर्माने लिहिली असून आनंद एल राय याचं दिग्दर्शन करणार आहेत. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar announced his new movie raksha bandhan ssv