अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या घरी लवकरच आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. करीना कपूर दुसऱ्यांना आई होणार आहे. खुद्द सैफ व करीनाने याबद्दलची माहिती दिली. “आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद”, असं सैफ व करीनाने म्हटलंय.
काही महिन्यांपूर्वीच करीनाचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तिला दुसऱ्यांदा आई होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा “दुसऱ्या मुलासंदर्भातील आनंदाची बातमी सध्या आमच्याकडून नाही. आम्ही तैमुरबरोबर खूप आनंदात आहोत. आम्ही सध्या आमचे काम आणि तैमुरला अधिक वेळ देण्याच्या प्रयत्नात आहोत,” असं करिनाने म्हटलं होतं. मात्र आता करीनाने खरोखरंच कुटुंबीयांना व चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे.
ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ-करीनाने लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. तैमुर तीन वर्षांचा असून सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर करीना व सैफ अली खानवर शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे.