बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना करोनाची लागण झाली आहे. कुमार सानू यांच्या टीमने फेसबुकद्वारे चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली. ‘दुर्दैवाने सानूदा यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कृपया त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा’, अशी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिकेत जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अमेरिकेत काही दिवस पत्नी सलोनी आणि मुली शनॉन व अॅनाबेल यांच्यासोबत राहण्याचा प्लॅन करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. येत्या २० ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस असून हा दिवस कुटुंबीयांसोबत घालवण्याची त्यांची इच्छा होती.

आणखी वाचा : ..म्हणून हेमा मालिनीशी लग्न करण्यास गिरीश कर्नाड यांनी दिला होता नकार

कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार हा ‘बिग बॉस’च्या चौदाव्या सिझनमध्ये सहभागी झाला आहे. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी त्याने कुमार सानूच्या चाहत्यांना त्याला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. जान कुमारसुद्धा गायक असून तो कुमार सानू यांची पहिली पत्नी रिटा यांचा मुलगा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumar sanu tests positive for covid 19 ssv