पायरसीची किड चित्रपटसृष्टीला पोखरून काढत आहे. कोणताही नवा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो इंटरनेटवर लीक होत आहे. यापूर्वी काला, संजू, कबाली यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या आधी किंवा प्रदर्शनाच्या दिवशीच इंटरनेटवर लीक झाले होते. मात्र याचा मोठा फटका निमार्त्यांना बसत आहे. 2.0 च्या बाबतीत असं घडू नये यासाठी जवळपास १२ हजार वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

2.0 ची निर्मिती कंपनी असलेल्या लायका प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं मद्रास हायकोर्टात पायरसी वेबसाइट्स ब्लॉक करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मद्रास हायकोर्टानं ३७ इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीला १२ हजार वेबसाईट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. यात तामिळ रॉकर्स या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या वेबसाइटच्या २ हजार मायक्रोसाइट्चादेखील समावेश आहे.

या पाच कारणांसाठी पाहावा रजनीकांत-अक्षय कुमारचा 2.0

लायका कंपनीनं याचिका दाखल करताना जवळपास १२ हजार ५६४  पायरसी करणाऱ्या वेबसाइटची यादी दिली होती. तामिळ रॉकर्स वेबसाईट ब्लॉक केल्यानंतर तिच्याच हजारो मायक्रोसाइट्स सक्रिय झाल्या आणि यातून चित्रपट लीक व्हायला सुरूवात झाली, असं कंपनीनं निदर्शनास आणून दिलं. 2.0 साठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत त्यामुळे इंटरनेटवर चित्रपट लीक झाला तर मोठं नुकसान होऊ शकतो असं याचिकेत म्हटलं होतं.

त्यामुळे खबरदारी घेत पायरसी करणाऱ्या वेबसाइट्स ब्लॉक कराव्यात असं कंपनीचं म्हणणं होतं. या याचिकेवर निर्णय देत १२ हजार वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. 2.0 हा २९ नोव्हेंबरपासून जगभरातील ७ हजारांहून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madras high court directed block over 12 thousand websites to stop rajinikanth 20 piracy