बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. बॉयफ्रेंड हिमांश कोहलीशी झालेलं तिचं ब्रेकअप आणि त्यानंतर भर कार्यक्रमात तिचं रडणं जगजाहीर आहे. सोशल मीडियावरही तिने नैराश्यात असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. नैराश्याच्या त्या काळात मला आत्महत्या करावीशी वाटली होती असं तिने ‘इंडियन आयडॉल ११’मधल्या एका स्पर्धकाशी बोलताना सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझ्याही आयुष्यात अशी एक वेळ होती जेव्हा मला माझं आयुष्य संपवावं असं वाटत होतं. कोणतीच गोष्ट मनासारखी होत नव्हती. पण हे विचार फक्त त्या काळापुरते असतात. अशावेळी तुम्हाला साथ देणारे आई-वडिल, भाऊ-बहिण, मित्रमैत्रिणी यांचा एकदा विचार करा, असं ती त्या स्पर्धकाला सांगत होती.

ब्रेकअपनंतर नैराश्यात असताना नेहाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने म्हटलं होतं, ‘हो मी नैराश्यात आहे. जगातील नकारात्मक लोकांचे मी आभार मानते. मला आयुष्यातील सर्वांत वाईट अनुभव देण्यात तुम्ही यशस्वी ठरला आहात. मी तुम्हाला विनंती करते, कृपया मला जगू द्या.’

नेहा ‘इंडियन आयडॉल १०’ या रिअॅलिटी शोची परीक्षक असताना हिमांशने सेटवर हजेरी लावत तिला सरप्राइज दिलं होतं. त्यावेळी या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. मात्र ब्रेकअपनंतर नेहाला शूटिंग करणंदेखील कठीण झालं होतं. बऱ्याचदा तिला सेटवरही रडू कोसळलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha kakkar wanted to commit suicide opens up on her low phase in life ssv