काही दिवसांपूर्वी ‘पौरषपुर’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. एकता कपूर निर्मित या वेब सीरिजमध्ये अभिनेता मिलिंद सोमण, अनू कपूर, शिल्पा शिंदे, शहीर शेख, साहिल सलाथिया, पोलोमी दास, अनंतविजय जोशी, फ्लोरा सॅनी, अश्मिता बख्शी आणि आदित्य लाल या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या सीरिजमध्ये अनू कपूर यांनी राजा भद्रप्रताप सिंह यांची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री अश्मिता बख्शीने राणी उमंगलता यांची भूमिका साकारली आहे. वेब सीरिजमध्ये अश्मिताने अनू कपूर यांच्यासोबत लव्ह मेकिंग सीन दिला असल्याचे पाहायला मिळते. या सीनमध्ये अश्मिताच्या पाठीवर गरम मेण ओतले होते. आता या सीनबाबत तिने एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पौरषपुर’ या वेब सीरिजच्या पहिल्याच भागात अश्मिताने लव्ह मेकिंग सीन दिला आहे. या सीनबाबत तिने ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य केले. ‘हा लव्ह मेकिंग सीन शूट करणे माझ्यासाठी कठिण होते. या सीनमध्ये माझ्या पाठीवर वितळलेले गरम मेण ओतण्यात आले होते. हे खरे वितळलेले गरम मेण वापरण्यात आले होते. तेव्हा मी सिलिकॉनच्या शीटने स्वत:ला कव्हर केले होते. त्यामुळे मला फार त्रास झाला नाही’ असे अश्मिता म्हणाली.

पुढे तिने अनू कपूर यांच्यासोबत सीन शूट करतानाचा अनुभव सांगितला आहे. ‘राजा भद्रप्रताप आणि राणी उमंगलता यांच्या पहिल्या रात्रीचा तो लव्ह मेकिंग सीन होता. मी थोडी नर्व्हस होते. मात्र अनू कपूर यांनी मी अनकम्फर्टेबल होऊ नये याची काळजी घेतली. आणि मी ठरवले होते, जर हा सीन करायचा आहे तर तो चांगला शूट झालाच पाहिजे’ असे पुढे अश्मिता म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paurashpur actress ashmita bakshi on the lovemaking scene with annu kapoor avb