‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रसारित होणारा फराह खानचा ‘लिप सिंग बॅटल’ हा शो सध्या चांगलाच गाजतोय. विविध सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात आणि आपल्या आवडत्या कलाकाराच्या गाण्यावर थिरकतात. फराह खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये नुकतंच अभिनेता राजकुमार रावनेही हजेरी लावली. मात्र, डान्स करत असतानाच त्याच्या पायाला दुखापत झाली. अंधेरीतील ‘यश राज फिल्म्स स्टुडिओ’मध्ये या शोची शूटिंग सुरू होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बरेली की बर्फी’ या चित्रपटातील त्याची सहकलाकार क्रिती सनॉनसोबत तो शूट करत होता. अक्षय कुमारच्या ‘चिंता ता चिता चिता..’ या गाण्यावर तो डान्सचा सराव करत होता. यासाठी त्याला उंचावरून उडी मारायची होती आणि उडी मारतानाच त्याचा तोल गेला आणि पायाला दुखापत झाली. लगेचच त्याला जवळच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पायाचा घोटा फ्रॅक्चर झाल्याने काही दिवस त्याला रुग्णालयातच आराम करावे लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. फराह खान आणि शोची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.

वाचा : अबब! इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘बाहुबली’ प्रभास

पायाच्या दुखापतीमुळे राजकुमारने त्याचे पुढील काही शूटिंग रद्द केले आहेत. रुग्णालयातील फराह खानसोबतचा एक फोटो त्याने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने फराह आणि प्रेयसी पत्रलेखाचे आभार मानले असून शूटिंग पूर्ण करू न शकल्याने क्रितीची माफीही मागितली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajkummar rao fractures ankle while dancing on akshay kumar song in lip sing battle