माझ्या कुटुंबाची पाळंमुळं पाकिस्तानात आहेत असं म्हणणारी अभिनेत्री सोनम कपूर सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तू पाकिस्तानात जाऊन का राहत नाहीस, असा सवाल तिला नेटकऱ्यांनी केला आहे. ट्रोल करणाऱ्यांना आता सोनमने सडेतोड उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तुम्ही जरा शांत व्हा. एखाद्याला नेमकं काय म्हणायचं आहे आणि त्यातून तुम्ही कसा चुकीचा अर्थ घेता याचा परिणाम बोलणाऱ्यावर होत नाही तर अर्थ काढणाऱ्यावरच होतो. त्यामुळे तुम्ही स्वत: कोण आहात हे आधी ओळखा आणि मग ट्रोल करा,’ असं तिने ट्विटद्वारे म्हटलंय.

आणखी वाचा : करणच्या घरी सेलिब्रिटींची ड्रग्ज पार्टी? जाणून घ्या सत्य

‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सोनमने तिच्या कुटुंबाचं नातं पाकिस्तानशी कसं जोडलं गेलं आहे हे सांगितलं. सिंधी असल्यासोबतच मी पेशावरीसुद्धा आहे असं ती म्हणाली. मात्र सोनमचं विधान नेटकऱ्यांना रुचलं नाही. सोनमने पुन्हा एकदा बेताल वक्तव्य केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. काहींनी तिला थेट पाकिस्तानात जाऊन राहण्याचा सल्ला दिला.

एखाद्या वक्तव्यामुळे सोनम ट्रोल झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने मांडलेल्या मतांसाठी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor replies to trolls after told to shift to pakistan ssv