अभिनेता सलमान खानसोबत काम करण्यासाठी प्रत्येक अभिनेत्री उत्सुक असते. त्याच्यासोबत भूमिका साकारण्याची संधी मिळावी यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. मात्र एका अभिनेत्रीने त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असतानाही एक दोन वेळा नाही तर तब्बल सहा वेळा ऑफर रिजेक्ट केली आहे. आता तीच अभिनेत्री ‘किक २’मध्ये दबंग खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ही अभिनेत्री कोण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला ना? तर ती दुसरी-तिसरी कोणीही नसून दीपिका पदुकोण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर दीपिकाकडे तशा ऑफर्स आल्या होत्या. मात्र या ना त्या कारणाने तिचा सलमानबरोबरचा चित्रपट लांबणीवरच पडत होता. अखेर, शाहरूख खानबरोबर काम केल्यानंतर दुसऱ्या खानांकडे मोर्चा वळवणाऱ्या दीपिकाने सलमानसोबत चित्रपटासाठी होकार दिला आहे. ‘किक २’मधील या भूमिकेसाठी आधी जॅकलिन फर्नांडिसच्या नावाची चर्चा होती. मात्र आता त्यावर बॉलिवूडची मस्तानी दीपिकाचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

दीपिकाने रिजेक्ट केलेल्या चित्रपटांमध्ये ‘सुलतान’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘किक’ या चित्रपटांचा समावेश आहे. शाहरुखच्या आधी सलमान खानकडून पहिल्यांदा चित्रपट करण्याची संधी मिळाली होती, असं एका कार्यक्रमादरम्यान तिने सांगितलं होतं. मात्र त्यावेळी तुलनेनं खूपच नवीन असलेल्या दीपिकाने अजून कॅमेऱ्यासमोर काम करण्याची आपली तयारी नसल्याचं सांगत चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांति ओम’ हा चित्रपट तिने केला. मात्र आपल्याला सगळ्यात पहिली संधी सलमान खानने देऊ केली होती, ही गोष्ट कायम मनात असल्याचे स्पष्ट करत त्याच्याबरोबर काम करायची इच्छाही तिने वेळोवेळी बोलून दाखवली होती.

PHOTO : फुटबॉलपटू रोनाल्डिनो आणि वरुण धवनचा ‘याराना’

आता ‘किक २’च्या निमित्ताने सलमान-दीपिका ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. ‘किक’ या चित्रपटाचा हा सिक्वल असून पहिल्या भागात जॅकलिनने सलमानसोबत भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This actress has rejected salman khan six times