विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा खडतर जीवनप्रवास हा प्रत्येक कलावंतासाठी आदर्श असून ‘विठाबाई’ यांची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी आव्हान होते, असे मनोगत अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर-कोठारे यांनी नुकतेच व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विठाबाई यांच्या १५ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने नारायणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. आगामी ‘विठा’ या चित्रपटात ऊर्मिला कानेटकर-कोठारे ‘विठाबाई’ यांची भूमिका साकारत आहेत.

नम्रता एन्टरटेंन्मेंट व आपला पिक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून याचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले आहे. चित्रपटात अभिनेते उपेंद्र लिमये यांचीही मुख्य भूमिका आहे. या कार्यक्रमास विठाबाई यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urmila kanitkar kothare marathi actress talk about role of vithabai