‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. त्यामुळे जगभरातील सिनेकलावंतांना आपल्या नावाआधी ‘अँड ऑस्कर गोज.. टू…’ हे चार शब्द जोडले जाण्याइतका आनंद इतर कशातच सापडत नाही. कोणताही देश, भाषा असली तरी त्याला ‘ऑस्कर’ नावाचा परिस जोडला गेला, की त्याच सोनं होतं असं म्हणतात. परंतु या ‘ऑस्कर’ विजेत्यांची निवड करतं तरी कोण? जगभरात दरवर्षी एकापेक्षा एक शेकडो उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली जाते. परंतु त्यामधील मोजक्याच चित्रपटांची निवड करत कोण?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजेत्यांची निवड कोण करतं?

शास्त्रशुद्ध भाषेत ऑस्करला अ‍ॅकेडमी पुरस्कार असं म्हणतात. हा पुरस्कार ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्स’ या संस्थेतर्फे देण्यात येतो. किंबहूना याच संस्थेचे पहिले अध्यक्ष डग्लस फेअरबॅक्स आणि मेट्रोगोल्डविन मेयर यांच्या पुढाकारामुळे या पुरस्काराची सुरुवात झाली.

ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची निवड या संस्थेतर्फे निवडलेले चित्रपट समिक्षक करतात. या संस्थेचे सदस्य दरवर्षी जगभरातील चित्रपट स्पर्धांना गुप्तपणे हजेरी लावतात. आणि तेथील चित्रपट समिक्षकांचे निरिक्षण करतात. त्यांच्या लिखाणाची पद्धत, विचार करण्याची शैली, तटस्थपणा आणि इतर काही गुण यांच्या जोरावर काही मोजक्या समिक्षकांची निवड केली जाते. या समिक्षकांकडे कॅमेरा, दिग्दर्शन, निर्मिती, स्पेशल इफेक्ट अशा विविध विषयांचे सखोल ज्ञान असते.

त्यानंतर निवडलेले मोजके समिक्षक अ‍ॅकेडमी संस्थेतर्फे आयोजित केलेल्या काही विशेष परिक्षा देतात. त्यात उत्तीर्ण झालेल्यांना ऑस्कर स्पर्धेसाठी आलेल्या चित्रपटांचे समिक्षण करण्याची संधी मिळते. या चित्रपट तज्ञांवर कुठल्याही प्रकारचा दबाव येऊ नये म्हणून त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येते. तसेच त्यांची ओळख फुटल्यास त्यांना त्वरित कामावरुन काढून देखील टाकले जाते. २००७ च्या आकडेवारीनुसार अ‍ॅकेडमी संस्थेत ५८३५ समिक्षक होते. आणि हे आकडे दरवर्षी किमान ५० समिक्षक या गतीने वाढत जातात. या सर्व चित्रपट समिक्षकांना लाखो रुपयांचे मानधन देण्यात येते. हेच समिक्षक वोटिंग करुन वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड करतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who votes for the oscar awards mppg