पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल गाडीला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून एप्रिल २०२२ ते आतापर्यंत १ कोटी प्रवाशांनी या लोकलमधून प्रवास केला आहे. २०१९-२० च्या तुलनेत या वर्षात प्रवासी संख्येत ८५ टक्के वाढ असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०२७ मध्ये आली. त्याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने तिकीटदरात कपात करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढत गेला. पश्चिम रेल्वेवर दररोज ४८ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या होतात.

हेही वाचा >>> “हा तर झिंगे गट”, अब्दुल सत्तारांच्या ‘दारू पिता का?’ प्रश्नावरून ठाकरे गटाचं टीकास्र!

प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे १ ऑक्टोबरपासून सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात आणखी ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ७९ झाली आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये दररोजची सर्वाधिक तिकीट विक्री १५ हजार ७८९ होती. आता १९ हजारपेक्षा जास्त तिकीटे विकली जात आहेत. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढावी यासाठी मोटरकोच डब्यातील उपकरणे लोकलच्या डब्यात बसविलेली पहिली वातानुकूलित लोकल लवकरच पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या लोकलच्याही साधारण दहा फेऱ्या होतील. त्यामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरही एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत एकूण ७२ लाख ३२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Over 1 crore commuters travel by ac local on western railway mumbai print news zws