गुणवत्ता यादीकरिता गृहीत धरल्या जाणाऱ्या निबंध विषयातून १०० गुणांचा इंग्रजी विषय वगळण्याचा निर्णय ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ने  (यूपीएससी) घेतला आहे. आधीप्रमाणे इंगजी हा विषय आता केवळ पात्रता विषय म्हणून असणार आहे. त्यामुळे, उमेदवारांच्या इंग्रजी भाषेचा कस न तपासताच अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.
यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत इंग्रजी व एक प्रादेशिक भाषा हे प्रत्येकी ३०० गुणांचे विषय अनिवार्य स्वरूपाचे आहेत. पण, या दोन्ही विषयांचे गुण उमेदवारांची निवड करताना गृहीत धरल्या अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट केले जात नाहीत. १० मार्चला काढलेल्या नव्या अधिसूचनेत हे दोन विषय वगळण्यात आले होते. मात्र, इंग्रजी भाषा विषय ज्या विषयांचे गुण अंतिम यादीकरिता गृहीत धरले जातात त्या ‘निबंध’ या विषयात ‘भाग दोन’ म्हणून समाविष्ट करून त्याचे महत्त्व वाढविण्यात आले होते. निबंध विषयाच्या या दोन भागांसाठी प्रत्येकी २०० आणि १०० अशी गुणांची विभागणी होती. म्हणजे, इंग्रजी विषय केवळ पात्रतेपुरता न राहता त्याचे गुण अंतिम यादी जाहीर करताना महत्त्वाचे ठरणार होते. सनदी अधिकाऱ्यांच्या इंग्रजी भाषेचा कस पाहणाऱ्या या बदलाचे अनेक स्तरातून स्वागत होत होते.
सुधारित बदलांमध्ये निबंध या विषयातून इंग्रजी हा १०० गुणांचा विषय वगळण्यात आला आहे. मात्र, आता इंग्रजी पुन्हा एकदा अन्य प्रादेशिक भाषेप्रमाणे पात्रतेसाठीचा विषय म्हणून गृहीत धरण्यात येणार आहे.
निबंध या विषयाचे गुणही ३००वरून २५० करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१०मार्चचा नवा पॅटर्न
१) निबंध विषय
भाग १-निबंधात्मक – २०० गुण
भाग २-इंग्रजी भाषा – १००गुण
२) जनरल स्टडीज१ – २५०गुण
३) जनरल स्टडीज२ – २५०गुण
४) जनरल स्टडीज३ – २५०गुण
५) जनरल स्टडीज४ – २५०गुण
६) ऐच्छीक विषय१ – २५०गुण
७) ऐच्छीक विषय२ – २५०गुण
८) मुलाखत – २७५
एकूण – २,०७५
सुधारित पॅटर्न पात्रता विषय
१) इंग्रजी भाषा – ३०० गुण
२) प्रादेशिक भाषा – ३०० गुण
एकूण – ६०० गुण
अंतिम यादीसाठी गृहीत धरले जाणारे विषय
१) निबंध विषय – २५०गुण
२) जनरल स्टडीज१ – २५०गुण
३) जनरल स्टडीज२ – २५०गुण
४) जनरल स्टडीज३ – २५०गुण
५) जनरल स्टडीज४ – २५०गुण
६) ऐच्छीक विषय१ – २५०गुण
७) ऐच्छीक विषय२ – २५०गुण
८) मुलाखत – २७५
एकूण – २,०२५

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There no english fear for upsc final toppers list