बुलढाणा :  वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या बुलढाणा चिखली राज्य महामार्गावर ‘तो ‘ सुसाट वेगाने धावत आला…रस्ता ओलांडताना ‘त्याने’ एकदोन नव्हे तीन वाहनांना  धडक दिली… यामध्ये स्वतः जखमी झाला .पण त्याने किमान चार चालक आणि प्रवाशांना देखील गंभीर जखमी केले…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अपघाताने राज्य मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी थबकली आणि सर्व जण अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ‘त्याला’ बघण्यात व्यस्त झाले…

होय! याचे कारण म्हणजे बुधवारी  ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उशिरा झालेला हा अपघात  विचित्र, अनपेक्षित आणि अतिशय दुर्मिळ ठरावा असाच होता. कारण हा  अपघात घडला होता, रोही नावाच्या  अतिशय ताकदवान वन्य प्राण्यामुळे!  शेतीची आणि पिकांची काही मिनिटात नासाडी करणारा  प्राणी म्हणजे रोही होय!  बुलढाणा जिल्ह्यात या प्राण्याने मागील काही वर्षांपासून धुमाकूळ घालून शेतीची नासाडी करणे हाच याचा धंदा. याच्या ताकदीमुळे साधे कुंपण किंवा माणसांनी त्याला रोखणे अशक्य ठरते.

हेही वाचा >>> गरिबांपासून मध्यमवर्गीयांपर्यत सर्वांची धावाधाव,’ पेट्यां’मध्ये दडलंय काय?

धिप्पाड , मजबूत आणि  काटक असा हा प्राणी आहे.अशा या रोहिने बुधवारी संध्याकाळी बुलढाणा चिखली मार्गावरील हातनी गावाजवळ वेगळाच धुमाकूळ घातला.दोन्ही बाजूला असलेल्या झाडी झुडुपातून अतिवेगाने धावत आलेल्या या रोही ने तीन वाहनांना जोरदार धडक दिली.  यामुळे वाहने तर चेपलीच पण किमान चार ते पाच प्रवासी, चालक चांगलेच जखमी झाले.यात हा पठ्ठ्याही चांगलाच जायबंदी झाला. या  रोहीने दोन दुचाकीसह एका अपेला जोरदार धडक दिली.यात घटनेत ४ ते ५ जण जखमी झाल्याची  माहिती आहे. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी केले आहे.

हेही वाचा >>> संतापजनक ! अल्पवयीन मुलासोबत गोडाऊनमध्ये केले अनैसर्गिक कृत्य ; अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

शेतकरी त्रस्त

बुलढाणा – चिखली महामार्गावर वाहनांची वर्दळ असते.हातनी, केळवद या परिसरात मोठ्या प्रमाणात रोही असल्याने येथील शेतकरी त्रस्त झालेले आहे.अनेक वेळा रोही हा महामार्ग ओलांडत असतात. बुधवारला  महामार्ग ओलांडणाऱ्या रोहीने दोन दुचाकी तसेच एका एपेला धडक दिली

बेशुद्ध करून उपचार

या  घटनेतील जखमीना  उपचारासाठी चिखली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी रोही महामार्गाच्या बाजूला एका नाल्यात जाऊन पडला होता. दरम्यान विचित्र अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे बचाव पथक (‘रेस्क्यू टीम’) घटनास्थळी दाखल झाले .जखमी रोहीला बेशुद्ध करून उपचारासाठी बुलढाण्यात आणण्यात आले आहे. बुलढाणा वनविभागाच्या साहाय्यक उप वनसंरक्षक अश्विनी आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हा अपघात जखमी वगळता इतर वाहनचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मात्र आजही खमंग चर्चेचा विषय ठरला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four to five passengers badly injured after running nilgai hit three vehicles on buldhana chikhli highway scm 61 zws