वाघाशी झालेल्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना वाकडीच्या जंगलात रविवारी सकाळी उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १७१ मध्ये वन कर्मचारी गस्त घालत असताना रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास बिबट मृत अवस्थेत आढळून आला. मृत बिबट्याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत.

परिसरात वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्या असून वाघ व बिबट्यामध्ये संघर्ष झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli leopard died fight tiger forest amy