-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली आहे. ७ मे रोजी दुबईत सोनालीचा विवाह सोहळा पार पडला.कुणाल बेनोडेकरशी सोनालीने लग्नदगाठ बांधली आहे.
-
त्यानंतर सोनाली सध्या पूर्व अफ्रिकेतील सीशेल या आयलँडवर मिनीमूनसाठी गेलीय. सोनालीने सीशेल आयलँडवरील पती कुणालसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
यात सोनाली तिचं मिनीमून चांगलंच एन्जॉय करताना दिसतेय.
-
सोनालीने सीशेल ऑयलँडवरील समुद्रकिनारी निसर्गाच्या सानिध्यात पतीसोबत मोकळा वेळ घालवलाय.
-
हे फोटो शेअर करत सोनालीने खास कॅप्शन दिले आहेत. "मी कायमच अशी मुलगी होते जिला जग पाहायला आवडतं. माझ्या सारखाच प्रवास करायला आवडणारा भेटेपर्यंत मी बऱ्याचदा एकटीच प्रवास करायचे. कधी मित्रांसोबत, कधी मित्र-मैत्रिणींसोबत तर कधी अनोळखी व्यक्तींसोबत प्रवास करायचे. " अशा आशयाचं कॅप्शन सोनालीने तिच्या फोटोला दिलंय.
-
सोनालीने समुद्र किनारी झोका घेण्याची मजादेखील लुटली आहे.
-
सोनीलीने तिच्या या ट्रीपला मिनीमून म्हंटलं आहे. (All Photo- sonalee18588)
अफ्रिकेतील ‘सीशेल’ आयलँडवर सोनाली कुलकर्णीचं मिनीमून
सोनालीने सीशेल आयलँडवरील पती कुणालसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Sonalee kulkarni share minimoon photo from seychelles island east africa with husband kunal benodekar kpw