-
कलर्स मराठीवरील 'राजा रानीची गं जोडी' या लोकप्रिय मालिकेने महत्त्वाचे वळण घेतले आहे. राजा रानीवर ओढवलेलं संकट अखेर दोघांनी मिळून परतवून लावले आहे. पुन्हा एकदा वाईटावर चांगल्याचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाही.
-
संजू आणि रणजीत एकमेकांच्या साथीने मोठयातलं मोठं संकट दूर करतात. रणजीतच्या मार्गदर्शनामुळे संजूने खर्या गुन्हेगारांचा शोध लावला आणि गुलाबचा डाव मोडीस काढला आहे. संजूची जिद्द आणि प्रयत्नामुळे रणजीतची निर्दोष सुटका होणार आहे.
-
गुलाब रणजीतला जी कठोर शिक्षा देण्याचा बेत आखत होती तो आता संजूमुळे पूर्ण होऊ शकणार आहे. मीडिया समोरदेखीलं संजू आणि रणजीचं कौतुक होणार आहे.
-
रणजीतच्या सुटकेमुळे कुसुमावती नक्कीच खुश होतील, पण रणजीत – कुसुमावती मधील अबोला संजू कधी आणि कसा दूर करेल? यानंतर गुलाब कोणत नवं कारस्थान रचेल? अपर्णा-राजश्रीचे कारस्थान कधी घरच्यांच्या समोर येईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मालिकेमधून मिळणार आहे.
-
आता संजू कशी त्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणार? कशी रणजीतची सुटका करणार? कोणते अडथळे तिच्या मार्गात येणार? त्याला ती कशी पार करणार? हे मालिकेच्या येत्या भागात कळेल.
संजीवनी करणार रणजीतची निर्दोष सुटका!
Web Title: Colors marathi raja rani chi ga jodi preview psi sanjeevani ranjeet dhale patil serial update photos sdn