• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress payal jadhav birthay know her journey abeer gulal manvat murders zapuk zupuk movie kvg

Payal Jadhav: वडील शाळेत शिपाई, तिथेच शिकून मिळवले यश; जाणून घ्या अभिनेत्री पायल जाधवचा प्रवास

Marathi Actress Payal Jadhav: मराठी अभिनेत्री पायल जाधवचा आज वाढदिवस आहे. ‘अबीर गुलाल’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेल्या पायलने चित्रपट, वेबसीरीजमधूनही अभिनयाची झलक दाखवली आहे. (सर्व फोटो – i_mpayal / Instagram)

November 9, 2025 21:36 IST
Follow Us
  • Payal-Jadhav-Photo
    1/9

    कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ या मालिकेतील भूमिकेमुळे ओळख मिळवलेल्या अभिनेत्री पायल जाधवचा ९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने तिच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ.

  • 2/9

    अबीर गुलाल, परीस, गोलमाल या मालिकेतून आपल्या अभिनयाने पायल जाधवने मराठी रसिकांची मने जिंकली. त्यानंतर तिने विविध चित्रपट आणि वेबसीरीजमध्येही पदार्पण केले.

  • 3/9

    २०२३ साली आलेल्या बापल्योक या पहिल्याच चित्रपटात पायलने केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले.

  • 4/9

    २०२३ साली आलेल्या या चित्रपटात नागराज मंजुळे यांनी पायलला संधी दिली. दिग्दर्शक मकरंद माने यांनी टाकलेला विश्वास पायलने सार्थ करून दाखवला.

  • 5/9

    मानवत मर्डर्स या सोनी लिव्हवरील वेबसीरीजमध्येही पायल जाधवने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर अशा मोठ्या कलाकारांसमोर काम करताना तिच्यावर कोणतेही दडपण दिसले नाही.

  • 6/9

    ‘बिग बॉस मराठी ५’ व्या पर्वात विजयी ठरलेल्या सूरज चव्हाणच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘झापुक झुपूक’ या सिनेमातही पायल जाधवने काम केले होते.

  • 7/9

    अभिनेत्री पायल जाधवने ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सुरजच्या बहिणीची भूमिका साकारली होती. सूरज चव्हाणच्या बहिणीचं पात्र साकारताना मनापासून आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.

  • 8/9

    पायल जाधवचे वडील पुण्यातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. याच शाळेत शिक्षण घेऊन पायलने नंतर पुणे विद्यापीठातून मास्टर इन हेल्थ सायन्समधून पदवी घेतली. तसेच ललित केंद्रातून भरतनाट्यमध्येही पदवी मिळवली.

  • 9/9

    अभिनय, भरतनाट्य याबरोबरच पायल जाधवमध्ये इतरही कला आहेत. शिवजयंतीनिमित्त पायलने लाठीकाठी आणि तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखविणारा व्हिडीओ शेअर केला होता. तिचा हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला.

TOPICS
मराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress payal jadhav birthay know her journey abeer gulal manvat murders zapuk zupuk movie kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.